ठाण्यात घरफोडी करणारे तीन चोर जेरबंद

ठाण्यात घरफोडी करणारे तीन चोर जेरबंद

विद्यार्थ्यांनी मौजमजेसाठी केली घरफोडी

घरफोडीच्या एका गुन्ह्यांत संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलेल्या रेकॉर्डवरील तीन बिहारी आरोपींनी बंद झालेल्या दुसर्‍या घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याचा प्रकार गावदेवी परिसरात उघडकीस आला आहे. या आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून या तिघांनीही आतापर्यंत गावदेवी हद्दीतील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. फुल्लो मोहन मुखिया, संतोष रामजीवन मुखिया आणि लालू मोहन मुखिया अशी या तिघांची नावे आहेत. ते तिघेही बिहारच्या दरभंगाचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या तिघांनाही येथील स्थानिक न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा – ३० लाख रुपयांच्या घरफोडीचा पोलिसांकडून पर्दाफाश

अशी केली पोलिसांनी कारवाई

मनोज भुपतराय शाह हे व्यवसायाने व्यापारी असून ते गावदेवी येथील पृथ्वी सोसायटीमध्ये राहतात. जानेवारी महिन्यांत त्यांच्यासह विनीत सरकार यांच्या फ्लॅटमधून काही अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन सुमारे सव्वानऊ लाख रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने चोरी केले होते. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला. मात्र आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश न आल्याने या गुन्ह्यांचा तपास बंद झाला होता. याच दरम्यान गावदेवी पोलिसांच्या एका विशेष पथकाने तीन संशयित बिहारी गुन्हेगारांना घरफोडीच्या गुन्ह्यांत अटक केली. या तिघांकडून पोलिसांनी काही चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. हा मुद्देमाल दुसर्‍या गुन्ह्यांतील मुद्देमालापेक्षा जास्त होता, त्यामुळे या मुद्देमालाविषयी त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. यावेळी या तिघांनी जानेवारी महिन्यांत पृथ्वी सोसायटीमध्ये दोन फ्लॅटमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या तिघांनाही गुरुवारी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्यांना शुक्रवारी स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने आतापर्यंत दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या चौकशीतून त्यांचा इतर काही घरफोडीच्या गुन्ह्यांत सहभाग आहे का?, याचा तपास आता पोलीस करीत आहेत.


हेही वाचा – घरफोडी करणारे गुन्हेगार अटकेत

First Published on: November 23, 2018 8:27 PM
Exit mobile version