घरमुंबईघरफोडी करणारे गुन्हेगार अटकेत

घरफोडी करणारे गुन्हेगार अटकेत

Subscribe

११ गुन्ह्यांची उकल ; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

बंद घरे हेरून घरफोडी करणाऱ्या सराईत दोन गुन्हेगारांना अटक करण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. अकबर शेख (२१), मुंबई आणि आरोपी रमजान गालिब शेख (२७) यांना अटक केली. त्यांच्याकडून कळवा, ठाणे, मुंब्रा, उल्हासनगर, डोंबिवली परिसरात केलेल्या तब्बल ११ घरफोड्यांच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली. या ११ गुन्ह्यांत तब्बल १७ लाख ६६ हजार रुपयांचा सोन्याच्या दागिन्याचा आणि चांदीच्या दागिन्यांचा ऐवज हस्तगत केला.
वाढत्या घरफोडीला आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी कंबर कसली आहे. ठाणे पोलिसांनी परिमंडळ १ चे शोध पथकाद्वारे ठिकठिकाणी सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितींचा आधार घेऊन पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना पोलिसी हिसका मिळताच त्यांनी कळवा, ठाणे, मुंब्रा, उल्हासनगर, डोंबिवली परिसरात केलेल्या तब्बल ११ घरफोड्यांच्या कबुली दिली. या ११ गुन्ह्यात तब्बल १७ लाख ६६ हजार रुपयांचा सोन्याच्या दागिन्यांचा आणि चांदीच्या दागिन्यांचा ऐवज हस्तगत केला. यात १४ लाख ७३ हजार रुपयांचे ५०० ग्राम सोने, आणि ५४० ग्राम चांदीचे २ लाख ९३ हजार रुपयांच्या दागिन्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

दीड लाखाचे दागिने लुटले
मुलगा झाल्याने साडी वाटप सुरू असल्याची बतावणी करून दोन अनोळखी इसमानी एका वयोवृद्ध महिलेच्या अंगावरील दीड लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना ठाण्यात घडली. त्यामुळे ठाण्यात वयोवृद्ध नागरिकांना लुटण्याचे प्रकारात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मुंब्रा येथील मयुरी अपार्टमेंट,संतोष नगर परिसरात राहणाऱ्या वयोवृद्ध फाशीबाई या मार्केट रोडने पायी चालत भाजीपाला आणण्यासाठी आल्या होत्या. याचवेळी दोन अनोळखी इसम त्यांच्या जवळ आल्या. प्रकाशला मुलगा झाला आहे. आनंदात साड्यांचे वाटप सुरू आहे अशी बतावणी करीत त्यांना शेजारच्या इमारतीत घेऊन गेले. याचवेळी त्यांच्या अंगावरचे दागिने काढा असे सांगत तीन तोळ्याची सोन्याची चैन चार सोन्याच्या बांगड्या असा दीड लाखाचा सोन्याचा ऐवज घेऊन दुकलीने पोबारा केला. मुंब्रा पोलीस दुकली भामट्यांचा शोध घेत आहे.

सेतू केंद्रातून दोघांना अटक
ठाण्याच्या तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात रहिवासी दाखल्यासाठी चार हजारांची लाच घेणाऱ्या दोघा खासगी व्यक्तींना ठाणे लाचलुचपत विरोधी पथकाने शनिवारी रंगेहाथ अटक केली आहे. रिझवान शेख (२२) आणि साजिद सय्यद (३८) अशी दोघा लाचखोरांची नावे असून त्यांनी सेतू केंद्रातील कोणत्या अधिकाèयाच्या सांगण्यावरून ही लाच घेतली याचा उलगडा झालेला नाही. या प्रकरणी ठाणे नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या सेतू केंद्रात विविध दाखल्यांसाठी रहिवाशी येत असल्याने इथे दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. दलाला शिवाय दाखले मिळत नाहीत अन्यथा अशा येणाèया अर्जात त्रुटी काढून हैराण केले जात असल्याच्या तक्रारी नेहमीच होत असतात. मात्र, अधिकारी वर्गाकडून दखल घेतली जात नाही. अशाच प्रकारे रहिवास दाखला काढण्यासाठी आलेल्या तक्रारदाराकडे शेख आणि सय्यद या दुकलीने ४ हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रार केल्यावर लाचलुचपत विरोधी पथकाने सापळा रचून दोघांनाही अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -