नाशिक शहर पोलीस दलात करोनाचा पहिला बळी

नाशिक शहर पोलीस दलात करोनाचा पहिला बळी

नाशिक जिल्ह्यात करोनाने धुमाकूळ घातला असून नाशिक ग्रामीण पोलीस दलापाठोपाठ नाशिक शहर पोलीस दलात करोनाने शिरकाव केला आहे. शहर पोलीस दलातील एका करोनाबाधित पोलीस कर्मचार्‍याचा करोनामुळे झाला असून पोलीस दलात खळबळ उडाली आहे. शहर पोलीस दलातील पहिला करोना बळी आहे. दरम्यान, शहर पोलीस दलात ८ कर्मचारी करोनाबाधित आहेत. त्यापैकी ५ करोनामुक्त झाले आहेत. अद्याप दोघांवर उपचार सुरू आहेत.

नाशिक शहरात दिवसेंदिवस करोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागासह पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. शहरातील चौकाचौकात कर्तव्य बजावत असताना शहर पोलीस दलातील ८ पोलीस करोनाबाधित झाले आहेत. बुधवारी (दि.१) इंदिरानगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यावर मुंबई येथे रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर गत १५ दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, फुफ्फुसाचा संसर्ग वाढल्याने मुंबईतील रूग्णालयात मंगळवारी (दि.३०) रात्री ८ वाजेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहर पोलीस दलातील हा करोनाचा पहिला बळी आहे.

First Published on: July 1, 2020 1:51 PM
Exit mobile version