सचिन वाझे डान्सबार, लेडीजबारवरही धाडी टाकण्यात होते आघाडीवर

सचिन वाझे डान्सबार, लेडीजबारवरही धाडी टाकण्यात होते आघाडीवर

सचिन वाझे डान्सबार, लेडीजबारवरही धाडी टाकण्यात होते आघाडीवर

एनकाउंडर स्पेशलिस्ट आणि गुन्हे गुप्तवार्ता विभागाचे (CIU) प्रमुख सचिन वाझे (sachin waze) हे मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी (mansukh hiren death case) अडचणी आलेले असतानाच आता नवनवीन धक्कादायक माहिती पुढे येत आहे. गुन्हे गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख असूनही वाझे हे मागील तीन महिन्यांहून अधिक काळ मुंबईतील लेडीजबार, डान्सबार, हुक्काबार यावरील रेड टाकण्यात आघाडीवर होते, अशी माहिती एका ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने आपलं महानगरशी बोलताना दिली. साधारणपणे डान्सबार, लेडीजबारवर धाड टाकण्याचे काम हे सोशल सर्व्हिस ब्रांच हे युनिट करते. मात्र नियुक्तीनंतर पुन्हा काही महिन्यात वाझे हे बारवर धाड टाकण्यात सोशल सर्व्हिस ब्रांचसोबत जात होते, अशी माहिती पुढे येत आहे.

लेडीजबार, डान्सबारमध्ये काही महिलांना, अल्पवयीन मुलींना त्यांच्या मनाविरुद्ध काम करावे लागते. तसेच त्यांचे लैगिंक शोषणही होत असल्याचे अनेक प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. त्यामुळेच मुंबई पोलिसांची सोशल सर्व्हिस ब्रांच हे मुंबईतील अवैधरित्या सुरू असलेल्या डान्सबार आणि लेडीजबारवर धाडी टाकतात आणि महिला, अल्पवयीनमुलींची तिथून सुटका करतात. मात्र यापूर्वी कधीही सोशल सर्व्हिस ब्रांचसोबत सीआययू युनिटचा प्रमुख जात नसतो. याकडेही आयपीएस अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. सोशल सर्व्हिस ब्रांचचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्यासोबत सचिन वाझे यांनी धाडी टाकल्या, असे गुन्हे शाखेकडूनच सांगण्यात येत आहे. मुंबईतील डोंगरी, कुलाबा, गोरेगाव, अंधेरी, भायखळा, घाटकोपर, कांदिवलीसह अनेक लेडीजबार, डान्सबारवर मागील तीन महिन्यांत धाड टाकल्याची माहिती येतेय. तर आणखीन धक्कादायक माहिती हाती येऊन शकेल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

माजी गृहमंत्री आर.आर पाटील यांनी मुंबईतील लेडीजबार, डान्सबार बंद करण्याचा धडाकेबाज निर्णय १५ वर्षांपूर्वी घेतला होता. त्यावेळी सोशल सर्व्हिस ब्रांचद्वारे अवैधरित्या लेडीजबार, डान्सबारवर छापा टाकला जायचा आणि महिला, अल्पवयीन मुलींची लैंगिक शोषण रोखले जात होते. आणि असे बार चालवणाऱ्या मॅनेजर आणि मालकाला अटक करून अनेकदा तुरुंगातही पाठवले आहे. मात्र वाझे यांची नियुक्ती मुंबई पोलीस दलात झाल्यानंतर सोशल सर्व्हिस ब्रांचसोबतच ते धाडी टाकून तोडपाणी करण्यात आघाडीवर असल्याचे असं दबक्या आवाजात सोशल सर्व्हिस ब्रांच कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

सचिन वाझे यांनी यापूर्वी ६३ गुंडांचे एनकाउंटर केले असून घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपी ख्वाजा युनूस यांच्या हत्येप्रकरणी २००४ साली त्यांचे निलंबन झाले होते. २००७ साली वाझे यांनी पोलीस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. मात्र जून २०२०मध्ये कोरोना काळात पोलिसांची कमतरता भासू नये म्हणून वाझे यांना पुन्हा पोलीस दलात सामावून घेण्याचा निर्णय घेतला. २००८ मध्ये वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर असलेली स्कॉर्पियो गाडी आणि त्या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणात संशयित असलेल्या वाझेची मागील काही दिवसात पोलखोल केलेली आहे. मनसुख हिरेन यांची पत्नी विमल हिरेन यांनी तर सचिन वाझे यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा जबाब नोंदवला आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास एटीएस करीत असून स्कॉर्पिओ गाडीचा तपास एनआयए करत आहे. सध्या स्कॉर्पिओ गाडीच्या प्रकरणात एनआयएने कसून तपास सुरू ठेवला. एनआयएच्या टीमने मुंबईतील सह पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन तपासबाबात चर्चा केली. त्यामुळे वाझे यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता असून वाझेंना निलंबित करावे, अशी मागणी विरोधकांनी विधीमंडळात लावू धरलेली आहे.


हेही वाचा – पती मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केल्याचा संशय!


 

First Published on: March 10, 2021 9:36 AM
Exit mobile version