Jitendra Awhad यांच्या बंगल्याबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ; भाजप विरोधात राष्ट्रवादीची घोषणाबाजी

Jitendra Awhad यांच्या बंगल्याबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ; भाजप विरोधात राष्ट्रवादीची घोषणाबाजी

ओबीसी समाजाबाबत वादग्रस्त विधान केल्याने काही राजकीय पक्ष आणि ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत.त्यानंतर आमदार आव्हाड यांनी आपल्या बंगल्यावर पुण्यातून मोर्चा येणार असल्याचे ट्विट केले होते. त्यामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आव्हाडांच्या नाद बंगला येथे जमा झाल्या. यावेळी पोलिसांनी ही चोख बंदोबस्त तैनात केला आहे. याचदरम्यान त्या आव्हाडांच्या बाजूने आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर आव्हाडांच्या घरी सकाळपासून 60 ते 70 कार्यकर्ते नगरसेवक, शहर अध्यक्ष ही फौज तैनात आहे. बंगल्यापासून दोन्ही बाजूला काही अंतरावर बॅरिकेटिंग करून रस्ता बंद केला.

दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील एका जाहीर सभेत गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी ओबीसी समाजबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते, त्यानंतर अनेक राजकीय पक्ष आणि ओबीसी समाजातील नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती, मात्र मंगळवारी रात्री आव्हाड यांनी पुन्हा सांगितले की ते त्यांच्या विधानावर ठाम आहेत, इतिहास कोणी बदलू शकत नाही, त्यामुळे आज त्यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येतोय, 2 बस भरून पुण्यातून माणसे येणार आहेत असे आव्हाड यांनीच ट्विट करून सांगितले आहे, त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त लावण्यात आला आहे.

 

 


हेही वाचा – Uddhav Thackeray : ज्याला दाखवायचं त्याला मी वेळेत दाखवतो, मुख्यमंत्री ठाकरेंची विरोधकांच्या टीकेवर प्रतिक्रिया


 

First Published on: January 5, 2022 12:13 PM
Exit mobile version