पोलिसांनी सुरक्षिततेची भावना निर्माण करावी – मुख्यमंत्री

पोलिसांनी सुरक्षिततेची भावना निर्माण करावी – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड जिल्ह्यातील गुन्हे सिध्दीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. छोट्या गुन्हांची उकल करण्यावर भर देऊन सामान्य माणसामध्ये यामुळे सुरक्षिततलेची भावना तयार होईल. पोलीस ठाण्यात गेल्यास आपणास संरक्षण मिळेल, न्याय मिळेल असा विश्वास सामान्य नागरिकांमध्ये निर्माण करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बाबतची आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पालकमंत्री पंकजा मुंडे, मुख्यमंत्र्याचे अपर प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, प्रभारी जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा – अमृता फडणवीसांची डेंजर सेल्फी; पोलीस हतबल

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘लोकांशी संवाद साधल्याने लोकांची पोलिसांप्रतीची आत्मियता वाढते, आपल्याला पोलिसांकडून न्याय मिळेल हा विश्वास समाजामध्ये व्यापक प्रमाणात दृढ होण्यास मदत होते’. त्याचबरोबर दाखल झालेल्या गुन्ह्यांवर दोषसिध्दीचे आणि गुन्हेगारांना योग्य शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी नागरिक आणि पोलीस तसेच पोलिसांच्या सरकारी वकीलांसोबतचा संवाद महत्वाचा घटक आहे, असेही ते म्हणाले. फडणवीस पुढे म्हणाले की, दारु, जुगार, सट्टा आणि वाळू तस्करांवर कारवाई करुन गुन्हेगारांवर जरब बसवावी. महिलांवरील अत्याचाऱ्याच्या गुन्ह्यांना नियंत्रीत करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, जेणेकरुन त्याद्वारे योग्य उपाययोजना करुन गुन्ह्यांवर प्रतिबंध घालता येतील. त्याचप्रमाणे दोषसिध्दीचे प्रमाण वाढून गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी सबळ पुरावे, साक्षीदार फितूर होण्याचे प्रमाण कमी करण्यावर प्रामुख्याने भर देण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी. तांत्रिक पुराव्याचा वापर करण्याचे प्रमाण वाढवावे. ऑनलाईन तक्रारी नोंदणीसाठी व्यापक प्रमाणात नागरिकांना जनजागृती करुन माहिती द्यावी. अधिक सतर्कतेने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी निर्देश दिले.


हेही वाचा – पोलीस कॉन्स्टेबलचा मुख्यमंत्र्यांनी केला सन्मान

First Published on: November 12, 2018 10:22 PM
Exit mobile version