रंग बदलणाऱ्यांनाही होळीच्या शुभेच्छा – धनंजय मुंडे

रंग बदलणाऱ्यांनाही होळीच्या शुभेच्छा – धनंजय मुंडे

धनंजय मुंडे

राजकीय वर्तुळात आज होळीचा एक नवा रंग पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे धनजंय मुंडे यांनी त्यांच्या ट्वीटरवरुन सगळ्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, या शुभेच्छा देतेवेळी त्यांनी शिवसेना आणि भाजप पक्षावर खोचक टीकादेखील केली. रंगपंचमीच्या शुभेच्छांच्या ट्वीटमध्ये मुंडे यांनी ‘वेळोवेळी रंग बदलून सर्वांनाच चकित करणाऱ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा’ असं लिहीत विरोधकांवर निशाणा साधला. याशिवाय ‘नैसर्गिक रंगांचा वापर करुया, पर्यावरण पूरक धूलिवंदनचा आनंद लुटूया’, असा संदेशही त्यांनी या ट्वीटद्वारे दिला. यासोबतच मुंडे यांनी आणखी एक ट्वीट करत सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. ‘बुरा ना मानो होली है…असे म्हणत मुंडे यांनी युतीवर जोरदार टीका केली आहे. कभी तू फकीर लगता है, कभी आवारा लगता है, कभी तू चायवाला लगता है, कभी चोर चौकीदार लगता है’… अशी खोचक टीका त्यांनी ट्वीटद्वारे केली.

”महाराष्ट्राच्या जनतेचा कळवळा असल्याचा आव आणणाऱ्या, खुर्चीच्या मोहापायी राजीनामे खिशात घेऊन लोटांगण घालणाऱ्या, सत्तेला लाथ मारून-मारून दमलेल्या बाबाला, वाघ-शेळीचा खेळ खेळत वेळोवेळी आपले रंग बदलून सर्वांनाच चकीत करणाऱ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा”, असंही ट्विट मुंडे त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

युतीवरही टीका…

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शिवसेना-भाजपाच्या युतीवर टीका करण्यात आली आहे. ‘पुरे झाले आता जुमलेबाजीचे रंग, जनता इथे बेहाल हे घोटाळ्यांत दंग’ असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसनेकेली आहे. तर, दुसऱ्या ट्विटमधून युतीतल्या दोन्ही पक्षांचे खरे रंग देशाने पाहिले आहेत. आता तुमच्या भूलथापांना महाराष्ट्र बळी पडणार नाही  हे मात्र नक्की’, अशा शब्दांत टीका केली आहे.

First Published on: March 21, 2019 3:46 PM
Exit mobile version