राजीनामा की अभय? संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

राजीनामा की अभय? संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अडचणीत आलेले संजय राठोड मुख्यंत्र उद्धव ठाकरे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर  दाखल झाले आहेत. संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.आज मंत्रीमंडळाची बैठक होती. ही बैठक पार पडल्यानंर संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. मंत्रीमंडळाची बैठकीत संजय राठोड प्रकरणासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. दरम्यान, या बैठकीनंतर संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. सध्या वर्षा बंगल्यावर सर्व शिवसेना नेत्यांची बैठक सुरु आहे. त्यामुळे आता संजय राठोड यांच्यासंदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्याच्या राजकारणात वादंग सुरु आहेत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर अडचणीत सापडलेले वनमंत्री संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी येथे दाखल होत पत्रकार परिषद घेतली होती. संजय राठोड यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. संजय राठोड प्रकरणाचा फटका मुख्यमंत्री आणि सरकारच्या प्रतिमेला होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेत पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. पूजा चव्हाण प्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण करण्यात आलं आहे. परंतु सोशल मीडियातून आणि इतर मार्गाने माझी आणि बंजारा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चौकशीतून सत्य समोर येईल, असं संजय राठोड म्हणाले.

पूजा चव्हाणच्या कुटुंबाच्या दु:खात मी आणि माझा बंजारा समाज सहभागी आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण केलं जात आहे, ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे. गेल्या ३० वर्षांच्या माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार सुरू आहे. माझ्याबद्दल जे काही दाखवलं त्यात काहीही तथ्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीतून सत्य समोर येईल, असं संजय राठोड म्हणाले. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करु नका अशी हात जोडून विनंती त्यांनी केली.

First Published on: February 24, 2021 6:47 PM
Exit mobile version