पूजा तडस मारहाण प्रकरणात ट्विस्ट, आधी मारहाणीचा आरोप मग लग्न, तक्रारही घेतली मागे

पूजा तडस मारहाण प्रकरणात ट्विस्ट, आधी मारहाणीचा आरोप मग लग्न, तक्रारही घेतली मागे

पूजा तडस मारहाण प्रकरणात ट्विस्ट, आधी मारहाणीचा आरोप मग लग्न, तक्रारही घेतली मागे

वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेने बुधवारी सकाळी एक व्हिडिओ राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांना पाठवून सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले होते. रुपाली चाकणकर यांनी कारवाईची मागणी केली होती. या घटनेमुळे राजकीय वर्तुळाच एकच खळबळ माजली होती. रामदास तडस यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. तडस यांच्या सुनेचा आणि मुलगा पंकज तडस यांचा रितसर पुन्हा विवाह करण्यात आला आहे. यामुळे सकाळी मारहाणीचा आरोप आणि संध्याकाळी आरोप करणार्या पूजा तडसचे पुन्हा लग्न लावून दिल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पूजा तडस यांनी केलेल्या तक्रारीही मागे घेतल्या असून आता कोणतीही तक्रार नसल्याचे म्हटलं आहे. तसेच पंकज तडस यांनी विरोधकांकडून राजकारणापोटी बदनामी करण्यात आलं असल्याचा आरोप केला आहे.

भाजप खासदार रामदास तडस यांच्या सूनबाई पूजा तडसने सासरच्यांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पूजा तडस यांनी व्हिडिओ पाठवत मदतीची मागणी केली होती. माझ्या जीवाला धोका आहे. मला इथून घेऊन चला असे पूजाने व्हिडिओत म्हटलं आहे. या व्हिडिओची दखल घेत रुपाली चाकणकर यांनी पोलिसांत तक्रार करुन चौकशीचीही मागणी केली होती. मात्र अचानक या प्रकरणात वेगळा ट्विस्ट आला असून पूजाचे पुन्हा पती पंकज तडस सोबत रितसह लग्न लावण्यात आलं आहे. यामुळे पूजाच्या मनाचे समाधान झालं असून आता कोणतीही तक्रार नसल्याचे पूजाने सांगितले आहे.

विवाहानंतर पूजा तडसची प्रतिक्रिया

विवाह झाल्यानंतर एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पूजा तडसने म्हटल आहे की, मी माझी तक्रार मागे घेत आहे. आता कोणतीही तक्रार नाही आहे. पुर्वी जी तक्रार दिली होती ती बनावट विवाह संदर्भात दिली होती. मात्र आता माझा रितसर विवाह झाला आहे. त्यामुळे माझी सध्या कोणतीही तक्रार नाही. सकाळी मी खुप घाबरले होते. मी जेव्हा गाडी घेऊन गेली होती त्यावेळी कोणीतरी मला आडवे गेले… मला असं वाटलं की, आपल्या जीवाला धोका आहे.. त्यामुळे तक्रार केली होती. अशी प्रतिक्रिया पूजा तडस यांनी दिली आहे.

रुपाली चाकणकर या प्रकरणावर काय म्हणाल्या?

याच्यामध्ये माहिती देते की, ६ ऑक्टोबर २०२० रोजी शिववैदिक मंगल कार्यालय इथे विवाह नोंदणीपद्धतीने केला आहे. पंकज रामदास तडस यांच्यासोबत पूजाने लग्न केलं आहे. त्यांच विवाह प्रमाणपत्र माझ्याजवळ आहे. हे फक्त प्रमाणपत्र होते वैदिक पद्धतीने लग्न झालं नव्हते. वैदिक लग्न न झाल्यामुळे त्यांनी आरोप केले होते. गेले ३ ते ४ वर्षांपासून पूजाला आमिष दाखवण्यात आलं, आता त्यांनी समोर येऊन आरोप केले होते. यामुळे या आरोपांमुळे त्यांच्यासोबत वैदिक पद्धतीने लग्न केलं आहे.

कोणतीही मुलगी स्वतःचं संसार आणि वैयक्तिक आयुष्य चव्हाट्यावर आणतं नाही. त्या मुलीने तक्रार केली आहे. वर्धा पोलिसांत तक्रा केली आहे. परंतु राजकीय दबावामुळे यावर कारवाई झाली नाही. म्हणून नागपुर पोलीस आयुक्तांकडेही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची प्रत माझ्याकडे उपलब्ध आहे. यामुळे कोणतीही महिला जास्त त्रास सहन केल्यानंतर तक्रार करत असते. आज ते पूजाने व्हिडिओच्या माध्यमातून मांडलं आहे. यामुळे याची दखल घेऊन विवाह केला आहे. याच्यामध्ये सुपारी वगैरे घेतली नाही अशी आम्हाला अजिबात सवय नाही. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना सुपारी घेऊन अशा पद्धतीने षडयंत्र रचत असतील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहोत महिलांना मान सन्माण देणारा पक्ष आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

पूजा तडसने सकाळी केला होता आरोप 

First Published on: September 8, 2021 6:07 PM
Exit mobile version