तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट

तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट

प्रातिनिधिक फोटो

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांना नवीन संकटाला सामोरे जावे लागणार आहे. गेल्या वर्षीच्या कापसावर बोंडअळीने आक्रमण केले होते, तर यंदा कापूस व तुरीवर ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात निर्माण झाली आहे. तीन दिवसांपासून तुरीवर ढगाळ वातावरणाची काळी छाया नुकसानीचे संकेत देऊ लागल्याने शेतकरी काळजीत पडले आहे.  शेतकऱ्यांवर कधी, कोणते संकट कोसळेल, याचा काहीच नेम नाही. यासारखीच काहीशी परिस्थिती तिवसा तालुक्यात निर्माण झाली आहे.

अळ्या व रोगांची भिती

पीक हाती येत असतानाच सोमवारपासून तुरीवर आभाळाच्या गडद छायेमुळे शेंगा पोखरणाऱ्या अळ्या व यासह रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता दर्शविण्यात आली आहे. तिवसा तालुक्यात यावर्षी पाच हजार हेक्टरवर तुरीचे पीक असून, हे पीक सध्या जोमाने उभे झाले आहे. त्याला चांगल्या शेंगा धरल्या असून, त्या दाण्यांनी भरल्या आहे. त्यामुळे अपेक्षित असे उत्पन्न पदरात पडण्याची आशा निर्माण झाली असताना, निसर्गाने पुन्हा एकदा धोक्याची घंटा दिली आहे. अलीकडच्या तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने दाण्याने भरलेल्या तुरीच्या शेंगावर अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे कपाशी या पिकाला पाण्यामुळे ह्यलाल्याह्णची भीती निर्माण झाली आहे. कापसाच्या बोंडावर अळीचे आक्रमण होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणाचा थेट परिणाम तुरीवर होऊ लागला असून, कपाशीच्या बोंडावरही अळ्यांचा शिरकाव काही प्रमाणात सुरु झाल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.

First Published on: December 7, 2018 2:30 PM
Exit mobile version