महिला कर्मचाऱ्यांना दिलेल्या मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ; पोलिसांत गुन्हा

महिला कर्मचाऱ्यांना दिलेल्या मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ; पोलिसांत गुन्हा

प्रातिनिधीक फोटो

महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय आरोग्य विभागाच्या प्रशिक्षणात देण्यात आलेल्या नव्या मोबाइल्समध्ये अश्लील चित्रफित व छायाचित्र आढळल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून यासंदर्भातील अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे.

केंद्र सरकारने इव्हीन (इलेक्ट्रिक व्हॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्क) संदर्भातील अॅप विकसित केले आहे. त्याच्या माहितीसाठी नाशिक व मालेगाव मनपाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणादरम्यान उपस्थित महिला कर्मचाऱ्यांना स्मार्ट फोन्स देण्यात आले. त्यात अश्लिल क्लिप्स आणि फोटो असल्याचे कळताच, आरोग्य विभागाकडून हे मोबाईल तांत्रिक कारण पुढे करत तातडीने जमा करण्यात आले. या मोबाईल्समध्ये २५ ते ३० क्लिप्स असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाची वाच्यता होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी बरेच प्रयत्न करुनही शेवटी ते बाहेर आले. या घृणास्पद प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे असल्याने, हा विभाग त्यासंदर्भातील अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नाशिक महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने प्रशिक्षणात देण्यात आलेल्या नव्या स्मार्ट फोनमध्ये चक्क अश्लील चित्रफित आणि अश्लील छायाचित्र आढळल्याने याचा निषेध व्यक्त करून प्रशासनाला जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने डॉ. शेफाली भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिक महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देण्यात आले.या मोबाईलमध्ये २०१५ पासूनचे फोटो व्हीडोओ असल्याने हे मोबाईल नवीन आहे की नाही अशा शंका निर्माण होत आहे.

महिला कर्मचाऱ्यांना नव्या मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडिओ दिल्याने राष्ट्रवादीने आंदोलन केले

हे वाचा – वर्जिन मुलीशी लग्न करण्यासाठी बाप देणार २ कोटी रुपये 

यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा संशय आहे. याबाबत तांत्रिक कारण देत मोबाईल पुन्हा जमा करून घेण्यात आले असले तरी या घडलेल्या या घृणास्पद प्रकरणाची सखोल चौकशी करून सबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

First Published on: March 8, 2019 6:48 PM
Exit mobile version