घरदेश-विदेशवर्जिन मुलीशी लग्न करण्यासाठी बाप देणार २ कोटी रुपये

वर्जिन मुलीशी लग्न करण्यासाठी बाप देणार २ कोटी रुपये

Subscribe

आपल्या वर्जिन मुलीचे लग्न करण्यासाठी एका श्रीमंत बापाने एक वेगळीच युक्ती केली आहे. आपल्या होणाऱ्या जावयासाठी त्याने पैशाची अट ठेवली आहे. अटी पूर्ण करणाऱ्या जावयाला २ कोटींची रक्कम मिळणार आहे.

मुलींचे लग्न म्हणजे प्रत्येक बापासाठी तारेवरची कसरत असते. आपल्या मुलीवर प्रेम करणारा मुलगा मिळावा हे प्रत्येक बापाला वाटत असते. मात्र थायलंड येथील एका बापाने आपल्या मुलीचे लग्न करण्यासाठी एक वेगळेच पाऊल उचलले आहे. श्रीमंत बाप आपल्या मुलींचे लग्न जुळवण्यासाठी जावयांना पैशाचे आमिष दाखवतांना अनेकदा आपण चित्रपटात बघितले असेल. मात्र, थायलंडमध्ये प्रत्येकक्षात हा प्रकार बघायला मिळाला आहे. अर्बन रॉथोंग असे या श्रीमंत बापाचे नाव आहे. त्याची २६ वर्षीय मुलगी कर्णिस्ट नावाच्या मुलीचे लग्न करायचे आहे. आपल्या मुलीच्या मनात भरणाऱ्या मुलाला अर्बन रॉथोंग ३ लाख १४ हजार १६६ डॉलर्स (२ कोटी, १९ लाख, ६५ हजार, ७०१ रुपये) देणार असल्याचे त्याने घोषीत केले. ही घोषणा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे हा मुलीचा बाप चर्चेत आला आहे. 

काय आहेत अटी

अर्बन मूळ थायलंड येथील रहिवाशी आहे. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. मोठ्या प्रमाणात  आपल्या मुलीशी लग्न करण्यासाठी अर्बनने काही अटी ठेवल्या आहे. “मुलगा हुशार नसावा, फक्त त्याला लिहिता वाचता आले तरी पुरेसे आहे. मुलाकडे कोणतीही पदवी नसेल तरी चालेल. मुलगा परिश्रमी असावा तो आळशी नसावा. पैशाच्या बाबतीत मुलगा कंजूस असावा.” अशा अटी या बापाने ठेवल्या आहेत.

- Advertisement -

“सुरुवातीला बाबांनी केलेल्या घोषणेबद्दल मला धक्का बसला. मात्र यामध्ये दुसऱ्या पद्धतीने विचार करून मी बघितले. मी अजून सींगल आहे. मला लग्न करायचे आहे. मुलगा फक्त मला चांगली वागणूक देणारा असला तरीही चालेल.” – कर्णिस्ट, मुलगी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -