Pornography case: राज कुंद्राला किंचित दिलासा, अटकपूर्व जामीन अर्जावर २५ तारखेला सुनावणी

Pornography case: राज कुंद्राला किंचित दिलासा, अटकपूर्व जामीन अर्जावर २५ तारखेला सुनावणी

Raj Kundra Case: : राज कुंद्राला सुप्रीम कोर्टाचा दिलासा! अटकेला ४ आठवड्यांची स्थगिती

पॉर्न फिल्म (Pornography Case) रॅकेट प्रकरणात अटकेत असलेल्या राज कुंद्राला (Raj Kundra) मुंबई उच्च न्यायालयाने किंचितसा दिलासा दिला आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने २०२० मध्ये नोंदवलेल्या एफआयआर प्रकरणी राज कुंद्राला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं आहे. राजचा अटकपूर्व जामीन अर्ज २५ ऑगस्ट बुधवारपर्यंत सुनावणीसाठी राखून ठेवला आहे.

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ओटीटी प्लॅटफॉर्मवर नग्न कामुक सामग्री प्रसारित करण्याच्या संदर्भात ऑक्टोबर २०२० मध्ये राज कुंद्रावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये कुंद्राने अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. राज कुंद्रावर भादंवि कलम २९२, २९३ (अश्लील सामग्रीची विक्री), माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कलम ६६ ई, ६७, ६७ ए (लैंगिक सुस्पष्ट सामग्री प्रसारित करणे) आणि महिलांचे असभ्य प्रतिनिधीत्वाच्या तरतुदी (प्रतिबंध) कायदा अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

राज कुंद्राचे वकील प्रशांत पाटील यांनी राज कुंद्राच्या बाजूने युक्तीवाद केला. एफआयआरमधील सहआरोपी आधीच जामिनावर बाहेर आहेत. राज कुंद्रावर लावण्यात आलेले गुन्हे हे सर्व ७ वर्षांपेक्षा कमी कारावासासह दंडनीय आहेत आणि म्हणून या जामीन अर्जाला परवानगी दिली पाहिजे, असा युक्तीवाद कुंद्राच्या वकिलांनी केला.

मात्र या याचिकेला विरोध करताना अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी सांगितले की, या प्रकरणात आरोपीची भूमिका या प्रकरणातील इतर आरोपींपेक्षा वेगळी असल्याचं म्हटलं. न्यायमूर्ती संदीप के. शिंदे यांनी कुंद्राला अटक होण्यापासून संरक्षण देणारा अंतरिम आदेश २५ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत निर्देशित केला आहे.

 

First Published on: August 18, 2021 2:52 PM
Exit mobile version