काँग्रेस-शिवसेना आमच्यासोबत फिरायला तयार मात्र लग्नाला नाही, युतीवरुन प्रकाश आंबेडकरांचे मोठं वक्तव्य

काँग्रेस-शिवसेना आमच्यासोबत फिरायला तयार मात्र लग्नाला नाही, युतीवरुन प्रकाश आंबेडकरांचे मोठं वक्तव्य

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात युतीवरुन मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेस आणि शिवसेना आमच्यासोबत फिरायला तयार आहेत. परंतु लग्नाला तयार नाही असे वक्तव्य करत प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. काँग्रेससोबत आम्ही युतीचा प्रस्ताव मांडला होता परंतु त्यांनी ठरवावं युती करायची की नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोलामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी युतीसंदर्भात वक्तव्य केलं आहे. शिवसेनासोबत युती करण्यासाठी आम्ही तयार आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला एकदा भेटीसाठी बोलवलं होते परंतु त्यांची युतीबाबत बोलण्याची काही हिंमत झाली नाही. काँग्रेससमोरही युतीबाबत प्रस्ताव ठेवला होता. त्यावर युती करायची की नाही त्यांची ठरवयाचं. आम्ही लग्नाला तयार आहोत परंतु ते आमच्यासोबत फिरायला तयार आहेत लग्नाला नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, शिवसेनेसोबत आमचे संबध अजून चांगले आहेत. त्यांच्यासोबतचे संबंध तुटलेले नाही. आमची भाजपसोबतची युती शक्य नाही. परंतु शिवसेनेशी युती होऊ शकते. त्यांनी ठरवायचे आहे युती करायची की नाही. ते म्हणतात आमच्यासोबत फिरा पण लग्न करायला कोण तयार नाही असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.

ते दोस्तीच्या पुढे जायला तयार नाहीत

युतीबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ते युतीच्या प्रस्तावावर शिवसेनाची वाट पाहतो. काँग्रेसची वाट पाहतोय. ते फक्त आमच्यासोबत फिरा म्हणत आहेत. त्यांचे चांगले संबंध आहेत. ओळखही चांगली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही माझे चांगले संबंध आहेत. लग्न करायचं की नाही त्यांनी ठरवायचे परंतु ते दोस्तीच करायला मागतात पुढे जायला तयार नाहीत असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.


हेही वाचा : दीड वर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात

First Published on: April 13, 2022 4:06 PM
Exit mobile version