घरमहाराष्ट्रदीड वर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात

दीड वर्षानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दीड वर्षानंतर मंत्रालयात दाखल झाले. मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाही, अशी टीका विरोधक करत होते. राज्याला मुख्यमंत्री आहे की नाही असा उपहासात्मक सवाल केला जात होता. विरोधकांच्या टीका सुरु असताना मुख्यमंत्री आज मंत्रालयात दाखल झाले. त्यामुळे आजपासून राज्याचा कारभार पुन्हा एकदा सुरळीत चालायला सुरुवात होील, अशी प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अचानक मंत्रालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी भारतीय घटटेनेच शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब यांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन केलं. मी आज वर्षभरानंतर मंत्रालयात आलोय. त्यामुळे आढावा घेतोय. आढावा घेताना तुमचे मंत्री मंत्रालयात येतात का? असा हसत प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना विचारला. मुख्यमंत्री यांनी आज वित्त, महसूल, गृह आणि वन विभागात पाहणी केली. सोबतच कर्मचाऱ्यांशी देखील चर्चा केली. मंत्रालयातील फाईल्स बघून सर्व डाटा डिजिटल करण्याच्या देखील मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या.

- Advertisement -

दरम्यान, २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तीन महिन्यातच कोरोनाचं संकट आल्यानंतर मुख्यमंत्री ऑनलाईन बैठका घेऊ लागले. यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करायला सुरुवात केली. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, राज्याचा कारभार ऑनलाईन सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य चालवतात. मुख्यमंत्री कधीतरीच दिसतात, अशी टीका विरोधक करत होते. या टीकेनंतरही मुख्यमंत्री मातोश्री आणि वर्षावरुन राज्याचा कार्यभार हाकत होते. कोरोना काळात मुख्यमंत्र्यांचे बोटावर मोजण्याइतकेच दौरे झाले. मुंबईबाहेरचे अनेक दौरे रद्द करण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीला इतर मंत्री उपस्थित असले तरीही मुख्यमंत्री ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहत असत.

दरम्यान, १२ नोव्हेंबर २०२१ ला मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया झाली. २२ दिवस ते रुग्णालयात पचार घेत होते. रुग्णालयातून डॉक्टरांनी डिस्चार्जड दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. यामुळे मुख्यमंत्री वर्षा या त्यांच्या शासकिय निवासस्थानावरुन राज्याचा कारभार हाकत होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला देखील ते गैरहजर राहिले. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हजेरी लावली. तीन वेळेस त्यांनी अदिवेशनाच्या कामकाजात प्रत्यक्ष सहभाग घेतला.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -