Prakash Ambedkar : विधानसभेत वंचित-काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता, आंबेडकरांचे मोठे विधान

Prakash Ambedkar : विधानसभेत वंचित-काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता, आंबेडकरांचे मोठे विधान

विधानसभेत वंचित-काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता, आंबेडकरांचे मोठे विधान

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राज्यात पहिल्या दोन टप्प्यातील मतदान झाले असून अजून तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणे बाकी आहे. यंदाच्या लोकसभेत वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु, जागावाटपाची चर्चा फिस्कटल्याने ही युती होऊ शकली नाही. त्यानंतर आंबेडकरांनी 15 ते 20 जागांवर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. पण आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात, असे विधान आता स्वतः वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडून करण्यात आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यात वेगळे राजकीय समीकरण पाहायला मिळणार का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. (Prakash Ambedkar big statement on coming together of Congress and Vanchit Bahujan Aghadi)

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज शनिवारी (ता. 27 एप्रिल) पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेतून त्यांनी आगामी विधानसभेबाबत आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित एकत्र येऊ शकतात.आतापासूनच आपण तशी तयारी करायला हवी असा प्रस्ताव मी काँग्रेससमोर ठेवला आहे, असे आंबेडकरांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पण लोकसभेतील चर्चा फिस्कटल्यानंतर देखील आता आंबेडकरांना काँग्रेससोबत हातमिळवणी शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : पूनम महाजनांचा पत्ता कट, उत्तर-मध्यमधून उज्ज्वल निकम महायुतीचे उमेदवार

तसेच, यावेळी ते म्हणाले की, आम्ही मुंबईतही उमेदवार देणार आहोत. काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना त्यांचा विधानसभा मतदारसंघ सोडून उमेदवारी दिली आहे. त्यांना बळीची बकरी करण्यात आलं आहे. भाई जगताप त्या ठिकाणी लढण्यासाठी इच्छुक होते. त्यांना डावलून बाहेरील उमेदवार देण्यात आला आहे. काँग्रेसचा या खेळीचा आम्हाला फायदा होणार आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. तर, जागावाटप आणि अन्य मुद्द्यांमुळे वंचित आणि मविआमध्ये एकमत होऊ शकले नाही. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे वेगवेगळ्या मतदारसंघात आपले उमेदवार दिले आहेत, अशी माहिती आंबेडकरांनी दिली.

हेही वाचा… Maharashtra Congress : नसीम खान माझ्यासाठी उभे राहतील – वर्षा गायकवाड


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 27, 2024 6:10 PM
Exit mobile version