Prakash Ambedkar : कोण पृथ्वीराज चव्हाण? आंबेडकरांची काँग्रेसवर खरमरीत टीका

Prakash Ambedkar : कोण पृथ्वीराज चव्हाण? आंबेडकरांची काँग्रेसवर खरमरीत टीका

कोण पृथ्वीराज चव्हाण? आंबेडकरांची काँग्रेसवर खरमरीत टीका

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये हातमिळवणी होणार होती. परंतु, निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊन देखील मविआतील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत नसल्याने अखेरील वंचितने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय जाहीर केला. ज्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. इतकेच नाही तर आंबेडकरांनी माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण कोण? असा प्रश्न करत निशाणा साधला. (Prakash Ambedkar said who is Prithviraj Chavan)

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबाबत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाला जिंकायचेच नाही. कारण त्यांच्या मागे ईडी, सीबीआय आहे. मी त्यांच्यासोबत बोलणी करत होतो, तेव्हा मी म्हणालो तुम्ही खर्गेंच्या बाजूने सर्वांना एकत्र करताय पण राहुल गांधीच्या बाजूने पार्टी उध्वस्त करत आहात. तुम्ही सर्व प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करताय, ते ही निवडणूकीच्या तोंडावर, असे आंबेडकरांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? पवारांचा पंतप्रधानांवर हल्ला

काँग्रेससोबत जागा वाटपाची बोलणी फिस्कटल्याचे कारण सांगत आंबेडकरांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत म्हटले की, कोण पृथ्वीराज चव्हाण? मी का त्यांच्याशी बोलायचे? मी माझ्या स्टेटसच्या माणसासोबत बसेन. ते मुख्यमंत्री होते म्हणून त्यांच्याशी बोलावे, काय अधिकारी आहेत त्यांच्याकडे? त्यांना काँग्रेस पक्षात कोण विचारत नाही आणि आम्ही त्यांच्याशी बोलावे, असा टोलाच प्रकाश आंबेडकरांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लगावला आहे.

वंचित बहुजन आघाडी राज्यात 15 पेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवत आहेत. परंतु, मविआसोबत चर्चा सुरू असताना त्यांनी कमीत कमी 22 जागा मिळाव्यात अशी मागणी केली होती. परंतु, याबाबत मविआतील घटक पक्षांमध्ये कोणतीही अनुकूल परिस्थिती पाहायला मिळाली आणि ज्यानंतर वंचितने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. सुभाष देसाई सोबत असताना शिवसेनेला आमच्यासोबत जायचे होते. पण नंतर संजय राऊत आले आणि त्यांचा विचार बदलला, त्यामुळे त्यांनी मविआसोबत बोलणी सुरू केली. परंतु, त्यानंतर जागांची जुळवाजुळव होत नसल्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असेही प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सांगण्यात आले.

Lok Sabha 2024: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात दोन सभा; पंतप्रधान मोदींच्या आरोपांना काय उत्तर देणार


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 24, 2024 3:15 PM
Exit mobile version