घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रLok Sabha 2024: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात दोन सभा; पंतप्रधान...

Lok Sabha 2024: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात दोन सभा; पंतप्रधान मोदींच्या आरोपांना काय उत्तर देणार

Subscribe

पुणे/सोलापूर – काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काँग्रेसच्या घोषणापत्रावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची महाराष्ट्रात इंडिया आघीडीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा होणार आहे. पंतप्रधानांच्या टीकेला राहुल गांधी काय उत्तर देणार याची उत्सूकता आहे.

सोलापूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधींची बुधवारी दुपारी तीन वाजता येथील एक्झिबिशन मैदान, मरी आई चौक येथे सभा होणार आहे. प्रणिती शिंदे या सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या आहेत. विद्यमान आमदार असलेल्या प्रणिती शिंदेंच्या विरोधात भाजपने माळशिरसचे आमदार राम सातपूते यांना मैदानात उतरवले आहे. दोन्ही उमेदवार प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. येथे 7 मे रोजी मतदान होणार आहे. तर अमरावती लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अमरावतीमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, काँग्रेस नेते राहुल गांधींची या दोन मतदारसंघात सभा होणार आहे. सोलापूरसह राहुल गांधी अमरावतीमध्येही जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. तिथे काँग्रेसचे बळवंत वानखेडे उमेदवार आहेत.

- Advertisement -

पंतप्रधानांनी काय टीका केली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील प्रचारावेळी काँग्रेसच्या घोषणापत्रावर टीका केली आहे. हे घोषणापत्र काँग्रेसचे नाही तर मुस्लिम लीगचे घोषणापत्र वाटत असल्याचे ते म्हणाले. दुसऱ्या एका सभेत त्यांनी काँग्रेस तुमच्या घराचा, संपत्तीचा एक्सरे करणार आहे आणि तुमच्याकडील संपत्ती, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतील, असा आरोप केला आहे.

- Advertisement -

सोनिया गांधींनी मगंळसूत्राचं बलिदान दिलं – प्रियंका गांधी

पंतप्रधान मोदींच्या या आरोपांना काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींनी कर्नाटकातील जाहीर सभेतून उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, गेल्या 70-75 वर्षांच्या स्वतंत्र भारतात 55 वर्षे काँग्रेसचे सरकार राहिले आहे. या काळात काँग्रेसने कधीही कोणाचे सोने आणि मंगळसूत्र घेतलेले नाही. उलट काँग्रेसच्या काळात झालेल्या यु्द्धावेळी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतःचं सोनं देशासाठी अर्पण केलं होतं. तर माझी आई सोनिया गांधी यांनी त्यांच्या मंगळसूत्राचं देशासाठी बलिदान दिलं आहे. महिलांबद्दल असं वक्तव्य करताना पंतप्रधानांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे, असेही काँग्रेस महासचिव म्हणाल्या.

पंतप्रधान देशाची संपत्ती मोजक्या उद्योगपतींना वाटत आहेत, असा आरोप कर्नाटकातील सभेत प्रियंका गांधींनी केला. त्या म्हणाल्या की, नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही, मात्र मोठ-मोठ्या उद्योगपतींनी 16 लाख कोटी रुपये माफ केले आहेत. तर जेव्हा विरोधी पक्षाचे नेते जनतेसाठी आवाज उठवतात तर त्यांना तुरुंगात डांबले जाते.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज अमरावती आणि सोलापूरमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. ते महाराष्ट्रात काय बोलतात याची सर्वांनाच उत्सूकता आहे.

हेही वाचा : Lok Sabha Election 2024 : गृहमंत्री अमित शहांनीच कायदा तोडला, त्यांनी…; बच्चू कडूंचा हल्लाबोल

Edited by – Unmesh Khandale 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -