शिवसेना भाजपमध्ये प्रियकर प्रेयसीचे नाते – प्रकाश आंबेडकर

शिवसेना भाजपमध्ये प्रियकर प्रेयसीचे नाते – प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

भारिप बहुजन महासंघचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि भाजपवर मिश्किल टीका केली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये पती-पत्नीचे नव्हे, तर प्रियकर प्रेयसीचे नाते असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. नाशिकमध्ये बहुजन वंचित आघाडीची सभा पार पडली. या सभेमध्ये ते बोलत होते. भारिपने एमआयएमसोबत मैत्री केली, तर काँग्रेस भारिपला साथ देणार नाही, असा इशारा काँग्रेसने भारिपला दिला होता. याच मुद्याच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवरही सडकून टीका केली आहे.

हेही वाचा – निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारिप – एमआयएम युती

‘पती पत्नी नाहीत तर ते प्रियकर प्रेयसी’

गेल्या कित्येक दिवसांपासून भाजप आणि शिवसेनामध्ये मतभेद सुरु आहेत. शिवसेना आपल्या ‘सामना’ मुखपत्रातून भाजपवर दररोज ताशेरे ओढत असते. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देखील ‘शिवसेना को पटक देंगे’ असे वक्तव्य केले आहे. तरीदेखील दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. शिवसेना आणि भाजपच्या या मतभेदांना राजकीय वर्तुळात ‘पती पत्नीचे भांडण’, असे विशेषण दिले जात होते. मात्र, आता प्रकाश आंबेडकरांनी शिवसेना आणि भाजप हे पती पत्नी नाही तर प्रियकर प्रेयसी असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा – काँग्रेस आघाडीत सामील होण्याचे आंबेडकरांचे मार्ग बंद झाल्यात जमा

‘काँग्रेसला मुस्लिमांचे मते कशी काय चालतात?’

प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवरही टीका केली आहे. भारिपला जर काँग्रेससोबत युती करायची असेल, तर भारिपने एमआयएमला दूर करावे, असे काँग्रेसने सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ‘काँग्रेसला मुस्लिमांचे मते कशी काय चालतात?’, असा प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा – बहुजन चळवळीचा नवा पोश्टर बॉय: चंद्रशेखर आझाद

First Published on: January 14, 2019 5:50 PM
Exit mobile version