मविआच्या नादी लागू नका, अन्यथा… प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना सल्ला

मविआच्या नादी लागू नका, अन्यथा… प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना सल्ला

मागील काही दिवसांपूर्वी पक्षात बंडखोरीच्या चर्चा होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत बंडखोरीच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि पक्षाभोवती अनेक घडामोडी घडत असल्याचे दिसत असताना दुसरीकडे आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याचा प्रयत्न केलाय.

भांडुपमध्ये काल(बुधवार) संध्याकाळी वंचित बहुजन आघाडीची (VBA)जाहीर सभा झाली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. तसेच उद्धव ठाकरेंना सावध राहण्याचा सल्लाही दिला आहे. महाविकास आघाडीच्या नादी लागू नका, अन्यथा तुमचा राजकीय बळी जाईल. आम्ही शिवसेनेबरोबर जाणार हे आम्ही त्यावेळीच जाहीर केले आहे.

त्यांचा प्रयत्न आहे की, यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही सोबत यावे. त्यासंदर्भात मी म्हटलं की, नाना पटोलेंच्या वक्तव्याकडे लक्ष द्या. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती पाहून ताबडतोब ठाकरे गटाने निर्णय घेतला तर अधिक चांगले आहे, असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंना दिला.

प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनाही टोला लगावला. नाना पटोलेंची वक्तव्य म्हणजे इंग्रजी चित्रपट ‘हॉट अँड ब्लो’ प्रमाणे कधी गरम तर कधी नरम हवा निर्माण करणारी आहेत. नागपुरात ते म्हणाले स्वतंत्र लढायचे. मविआच्या बैठकीत म्हणतात एकत्र लढायचे. त्यामुळे त्यांच्या विधानांवर ठाकरेंनी लक्ष ठेवावे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.


हेही वाचा : कोरोना विषाणू कोण? हे जनता दाखवतेयं; ‘सामना’तील टीकेचा उदय सामंतांनी घेतला


 

First Published on: May 25, 2023 10:57 AM
Exit mobile version