तळीये गावातील ३६ निष्पाप बळी प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे, प्रवीण दरेकर यांची टीका

तळीये गावातील ३६ निष्पाप बळी प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे, प्रवीण दरेकर यांची टीका

तळीये गावातील ३६ निष्पाप बळी प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे, प्रवीण दरेकर यांची टीका

रायगड जिल्ह्यात तळीये गावात दरड कोसळल्यामुळे ३६ निष्पापांना आपले जीव गमवावे लागले असून हे निगरगट्ट आणि बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेचे बळी आहेत, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. प्रशासकीय यंत्रणा सुमारे २० ते २२ तासांनी दुर्घटनास्थळी पोहोचली. भावनाशून्य प्रशासन आणि बेजाबदार सरकारमुळे येथील पुरग्रस्तांना वेळीच मदत पोहोचली नाही. पावसाची तमा न बाळगता विरोधी पक्षातील नेते या ठिकणी वेळेत पोहोचू शकतात तर सत्ताधारी मंत्री, आमदार आणि प्रशासकीय यंत्रणेतील बेजबाबदार बाबू कुठे गायब झाले होते? असा संतप्त सवालही दरेकर यांनी केला.

दरेकर यांच्यासह माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी आज दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला भेट दिली. त्यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तळीये गावात दरड कोसळण्याची घटना काल सायंकाळी ४ वाजता घडूनदेखील आतापर्यंत सरकारची काहीही मदत किंवा प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी पोहोचली नाही. इथे तलाठीही नाही, जिल्हाधिकारी नाही. विरोधी पक्षनेते, भाजपाचे आमदार आणि कार्यकर्ते धडपडत गावात पोहोचतात. मात्र, सरकारी यंत्रणा पोहचली नाही. सरकारी यंत्रणा वेळेवर पोहोचली असती तर काही जीव वाचवता आले असते, असे दरेकर म्हणाले.

तळीये गावात स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांकडून बचावकार्य सुरू असताना राज्य सरकारला मात्र या दुर्घटनेचे काहीही सोयरसुतक दिसले नाही. कोकणातील घरे डोंगरावर वसलेली असल्यामुळे शासकीय यंत्रणांनी पूर्वीच काळजी घेतली पाहिजे होती. आधीच लोकांना सुरक्षित स्थळी हलविले असते तर काही जीव आपल्याला नक्कीच वाचवता आले असते, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

First Published on: July 23, 2021 11:09 PM
Exit mobile version