प्रदीप शर्मांची अटक होणं अपेक्षित होतं, वाझेंच्या मागे शर्मा असल्याचा दरेकरांचा आरोप

प्रदीप शर्मांची अटक होणं अपेक्षित होतं, वाझेंच्या मागे शर्मा असल्याचा दरेकरांचा आरोप

विनाअनुदानित शाळेतील ५० हजार शिक्षकांना तात्काळ मदत द्या, दरेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी मनसुख हिरने आणि सचिन वाझे प्रकरणात अटक करण्यात आली आहे. प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील घरांवर आणि कार्यलायवर एनआयएनं छापा मारला आहे. तसेच लोणावळ्यातून प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. शर्मा यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून शिवसेनेवर हल्लाबोल करण्यात आला आहे. प्रदीप शर्मांची अटक होण अपेक्षित होतं. शर्माच या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी दरेकरांनी केली आहे.

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माला अटक होणार हे अपेक्षित होतं. सचिन वाझे प्रकरण झालं किंबहून हिरेन यांची हत्या झाली. यामध्ये वाझेचा मास्टरमाईंड होता तो प्रदीप शर्मा होता आणि त्याच्या अंतर्गत सगळी मंडळी होती. खरं म्हणजे वाझे प्रकरण, मनसुख हिरेन प्रकरण हे हिमनगरचे टोक आहेत परंतु प्रदीप शर्मा आणि काही एन्काऊंटर स्पेशलिस्ट त्या काळात त्यांना काही नावलौकिक त्यांना मिळाला होता. त्यामाध्यमातून खंडणी क्षेत्र यांनी सुरु केलं आहे.

प्रदीप शर्मा जेव्हा ठाण्यामध्ये होते त्यावेळी बुकींना, बिल्डरांना, उद्योगपतींना उचलून आणत कोट्यावधींचा मलिदा जमवण्याचे काम केलं आहे. यामध्ये सरकारचा काही हस्तक्षेप आहे का सरकारच्या पाठींब्यामुळे सर्व काही शक्य झालंय हे हळूहळू पुढे येणार असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

प्रदीप शर्मा शिवसैनिक आहेत. सचिन वाझे शिवसेनेचे अधिकृत पदाधिकारी आहेत. प्रदीप शर्मा यांनी हितेंद्र ठाकूर यांच्याविरोदात वसई-विरारमध्ये निवडणूक लढवली आहे. प्रवक्तेही शर्मा आहेत अशा वेळी शिवसेनेची भूमिका काय आहे. जे दोन नेत्यांनी शिवसेनेच्या दोन निवडणूका लढवल्यात त्यांच्यावर जर कारवाई होत असेल तर पक्ष म्हणून भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडताना वाझेला क्लिन चीट देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यानंतर जे काही घडलं ते महाराष्ट्रानं पाहिले आहे. आता दोन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्यामुळे आता तुमची भूमिका काय आहे. हात वर करुन चालणार नाही स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

First Published on: June 17, 2021 4:11 PM
Exit mobile version