अनिल देशमुख, परमबीर सिंह नेमके आहेत कुठे?, प्रवीण दरेकरांचा सवाल

अनिल देशमुख, परमबीर सिंह नेमके आहेत कुठे?, प्रवीण दरेकरांचा सवाल

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. मात्र ते आता गायब असून हे दोघे नेमके कुठे आहेत? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी केला.

अनिल देशमुख महत्वाचे नेते असल्यामुळे ते नेमके कुठे आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला माहीत असणे अपेक्षित आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी किंबहुना पक्षाने अनिल देशमुख नेमके कुठे आहेत हे सांगण्याची आवश्यकता असल्याचे दरेकर आज प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. अनिल देशमुख मतदारसंघात आहेत, मुंबईत आहेत की इतर ठिकाणी याचा शोध सीबीआय, ईडी घेतीलच. परंतु सर्व कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी समोर यावे, असेही दरेकर म्हणाले.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्तसुद्धा सापडत नाहीत. खरे म्हणजे ते सेवेत कायम असल्याने सिंह नेमके कुठे आहेत ते राज्याच्या गृहमंत्र्यांना माहीत असणे अपेक्षित आहे. एकंदर राज्यामध्ये अशा प्रकारची गोंधळाची स्थिती निर्माण झाली असेल तर नेमके राज्याच्या गृह विभागात काय चालले आहे हे समोर येत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

 

First Published on: September 13, 2021 7:00 PM
Exit mobile version