Kirit Somaiya VS Hasan Mushrif: सोमय्यांवरील कारवाईत शिवसेनेचा हात झटकण्याचा प्रयत्न – दरेकर

Kirit Somaiya VS Hasan Mushrif: सोमय्यांवरील कारवाईत शिवसेनेचा हात झटकण्याचा प्रयत्न – दरेकर

दिवाळीमध्ये शिवसेनेचे सीमोल्लंघन, प्रवीण दरेकरांनी शुभेच्छा देत लगावला टोला

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे नेते किरीट सोमय्यांवरील कारवाईत मुख्यमंत्र्यांचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. सोमय्यांवरील कारवाई संबंधित मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे राऊत यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीबोलत असताना विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले की, किरीट सोमय्यांवरील कारवाीत शिवसेना हात झटकण्याचा प्रयत्न करत आहे. गृहमंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांनी मिळून कारवाई केली आहे.

नक्की काय म्हणाले दरेकर?

प्रविण दरेकर म्हणाले की, ‘आज खरं म्हणजे सरकार म्हणून अधिकृत मुख्यमंत्री कार्यालयाकडून ना नोटीस आलं किंवा सरकारचा प्रवक्ता बोलला. संजय राऊत शिवसेनेचे प्रवक्ते यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केलंय. त्यांनी केलेलं वक्तव्य उद्धव ठाकरे यांना माहिती आहे, असं गृहित धरून आणि जरी आपण असं मानलं. तरी हा हात झटकण्याचा प्रयत्न सरकारी पक्ष शिवसेनेचा दिसतोय. कारण अशाप्रकारची ज्यावेळेला मोठी कारवाई होते, त्यावेळेला जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित नोटीस काढू शकत नाही आणि नोटीस काढण्याचं धाडस करू शकतं नाही. गृहमंत्रालया, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांनी यांनी एकत्र चर्चा झाल्यावर समन्वय साधून निर्णय घेतल्याशिवाय अशी कारवाई होत नाही. मग याविषयी संजय राऊत यांनी सांगावं, कारवाई मग चुकीच्या पद्धतीने झाली आहे का? किंवा कारवाई अयोग्य आहे? मला वाटतं, सरकार म्हणून एकत्रित कारवाई झाली आहे.’

पुढे दरेकर म्हणाले की, ‘गृहमंत्रालयाने आणि मुख्यमंत्र्यांनी एकत्रपणे कारवाई केली आहे, हे १०० टक्के आहे. कारण यामध्ये जे विषय आहेत, ते दोन्ही पक्षांशी संबंधित आहेत. किरीट सोमय्यांनी कथित घोटाळ्याचा विषय हातात घेतला आहे, तो हसन मुश्रीफ यांचा संदर्भात आहे, अनिल परब यांच्यासंदर्भात आहे. त्यामुळे अफेक्टेड पार्टी हे दोन्ही पक्ष आहेत. यामुळे दोन्ही पक्षांना त्याठिकाणी याची झळ लागत आहे. मला वाटतं नाही ही फक्त गृहमंत्रालयाने कारवाई केली असेल आणि जरी केली असेल तरी यांच्यामध्ये किती सुसंवाद-विसंवाद आहे, हेही महाराष्ट्राच्या जनतेला दिसतंय जर त्याचं खरं म्हणणं माडलं तर. दरम्यान मुख्यमंत्र्यांची संमती असल्यावर अशाप्रकारची भूमिका किंवा त्या ठिकाणीची कारवाई करत नाही. आता संजय राऊत बोलतात ते अधिकृत की अनधिकृत आहे, हे माहित नाही.’


हेही वाचा – केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न – संजय राऊत


First Published on: September 20, 2021 11:43 AM
Exit mobile version