संजय राऊतांनी अर्थव्यवस्थेविषयी फुकटचे सल्ले मुख्यमंत्र्यांना द्यावे, दरेकरांचा राऊतांवर पलटवार

संजय राऊतांनी अर्थव्यवस्थेविषयी फुकटचे सल्ले मुख्यमंत्र्यांना द्यावे, दरेकरांचा राऊतांवर पलटवार

मविआ सरकार दारुड्यांची काळजी घेतेय, वाईन विक्रीच्या निर्णयावर प्रवीण दरेकरांची टीका

कोरोना महामारीमुळे देशाच्या आर्थव्यवस्थेचे तीन तेरा झाले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गतीमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची गरज आहे. असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात म्हटले आहे. यावर भाजप नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पलटवार केला आहे. संजय राऊतांनी असे फुकटचे सल्ले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना द्वावेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी २० लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना सल्ले दिले तर राज्यातील अर्थव्यवस्थेला नीट गती देता येईल असा टोला दरेकरांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत मोदींच्या सरकारमध्ये नव्या मनमोहन सिंगांची गरज असल्याचे म्हटले आहे. कोरोनाच्या संकटात देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. यावर दरेकरांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना काळात २० लाख कोटीचे पॅकेजही जाहीर केले आहे. त्यामुळे संजय राऊतांना अर्थव्यवस्थेच्या ज्ञानाची उजळणी करण्याची आवश्यकता आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग मागील १० वर्षात देशात जी प्रगती करु शकले नाही ती प्रगती मोदींनी मागील ५ वर्षांत केली आहे. त्यामुळे मोदींनी देश प्रगतीकडे नेला याचे भान शिवसेना नेते संजय राऊत यांनी ठेवावे किंवा समजून न समजल्यासारखे करत आहेत. असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. अर्थव्यवस्थेविषयीचे सल्ले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना द्यावेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या गटांगळ्याच काय त्यापेक्षा दुर्दैवी असणाऱ्या अर्थव्यवस्थेला नीट गती देता येईल असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

काय म्हटले होते संजय राऊत 

देशाची अर्थव्यवस्था कोरोना महामारीमुळे ढासळली आहे. आज देशात बेरोजगारी असल्यामुळे ६० टक्के कामगार बेकार झाले आहेत. तसेच राष्ट्रीय उत्पन्न दोन तृतीयांश खाली आले आहे. अशा संकटात देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नव्या मनमोहन सिंग यांची गरज आहे. अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. याला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

First Published on: April 25, 2021 7:36 PM
Exit mobile version