पुन्हा एकदा संकटात मोदींनी राज्यांची जबाबदारी शिरावर घेतली, मोफत लसीकरणाचे दरेकरांनी केले स्वागत

पुन्हा एकदा संकटात मोदींनी राज्यांची जबाबदारी शिरावर घेतली, मोफत लसीकरणाचे दरेकरांनी केले स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधला आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी २ मोठ्या घोषणा केल्या आहेत. मोदींनी म्हटले आहे की, २१ जूनपासून १८ वर्षांवरील नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येईल त्यामुळे आता देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच गरीब कल्याण योजनेत वाढ करत मोफत अन्न धान्य दिलं जाणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे गरीबांची काळजी घेणारे पंतप्रधान ठरले असून पुन्हा एकदा संकटात पंतप्रधा मोदींनी राज्यांची जबाबदारी शिरावर घेतली असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घोषित केला आहे. या निर्णयाचे स्वागत आहे. केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करावे अशी मागणी सातत्याने होत होती. शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशावासियांसाठी, देशातील गरीबांसाठी मोफत लसी देण्याचा निर्णय घोषित केला आहे. त्याच्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा मुद्दा निकाली लागला आहे. असे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

तसेच पुन्हा एकदा सिद्ध गरीबांचे काळजी घेणारे पंतप्रधान आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. देशातील ८० कोटी जनतेला गरीब कल्याण योजनेत वाढ करत पुन्हा अन्नधान्य देण्यात येणार असल्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतली आहे. केंद्रावर टीका करणाऱ्यांना सांगायचे आहे की, शेवटी केंद्र सरकारच आपल्या मदतीला आले आहे. समन्वयातूनच संकटातून आपण बाहेर येऊ या संकटावर सामना करण्यासाठी केंद्र सोबत एकत्र येऊन लढा देऊ असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

देशातील २ मुख्यमंत्र्यांना मोदींनी लायकी दाखवली

भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आधी लसीकरणाच्या विकेंद्रीकरणाची मागणी करुन तोंडावर आपटलेल्या महाराष्ट्र, दिल्ली आणि इतर राज्यांच्या अपयशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्सीर मात्रा लागू केली आहे. सोमवारी केलेल्या जाहीर संबोधनात पंतप्रधानांनी जनतेला दिलासा देणारी सर्वांना मोफत लसींच्या योजनेची घोषणा केली आहे. तसेच पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी देशाला केलेल्या संबोधनात देशातील दोन अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना त्यांची लायकी दाखवली आहे. अशी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करण्यात आली आहे. बडबड वीरांनी आता तरी आपली पोच ओळखून बाता माराव्यात असा टोलाही भातखळकर यांनी लगावला आहे.

First Published on: June 7, 2021 6:59 PM
Exit mobile version