महिलेने यशवंत -गोरखपूर या धावत्या लोकलमध्ये दिला बाळा जन्म

महिलेने यशवंत -गोरखपूर या धावत्या लोकलमध्ये दिला बाळा जन्म

महिलेने धावत्या लोकलमध्ये दिला बाळा जन्म

नागपूरात धावत्या लोकलमध्ये महिलेने एका गोंडस बाळा जन्म दिल्याची घटना घडली आहे. ही रेल्वे नागपूर स्थानकात थांबताच प्रसुती झालेल्या महिलेला नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. यशवंत -गोरखपूर विशेष गाडीमध्ये या महिलेने बाळाला जन्म दिला आहे. या महिलेची आणि बाळाची प्रकृती सध्या स्थिर आहे.या गर्भवती महिलेच्या प्रसुतीचा शेवटा महिना सुरु होता. प्रसुती होण्यासाठी तिला काही दिवसच शिल्लक होते. त्यामुळे बाळंतपणासाठी ती पतीसह माहेरी जात होती. ०२५९२ यशवंतपूर-गोरखपूर विशेष रेल्वेगाडीने प्रवास करत होते.

मात्र प्रवासादरम्यान तिला प्रसुती कळा सुरु झाल्या. असह्य वेदनेने ती कळवळू लागली. यावेळी पत्नीच्या असह्य वेदना पाहता पतीने गाडीत उपस्थित असलेल्या टीटीईला याची माहिती दिली. टीटीईने लगेच याची माहिती उपस्टेशन व्यवस्थापकांना दिली. यावेळी गाडीत उपस्थित नागरिकांनाही या महिलेच्या असह्य वेदना पाहता तिला सहकार्य केले. दरम्यान महिलेची गाडीतच प्रसुती झाली होती. या महिलेने एका गोंडस बाळाला गाडीतच जन्म दिला. दरम्यान गाडी सायंकाळी ५.०५ वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहचताच डॉक्टरांच्या देखरेखीखाली महिलेला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिला आणि तिचे बाळ सुखरुप आहे.


हेही वाचा- पुणे पालिकेचा अर्थसंकल्प सादर, महसूलवाढीसाठी ‘या’ उपाययोजना

 

First Published on: March 1, 2021 9:19 PM
Exit mobile version