टोमॅटोचे दर घसरले; ग्राहक खुशीत, शेतकरी चिंतेत

टोमॅटोचे दर घसरले; ग्राहक खुशीत, शेतकरी चिंतेत

नवी मुंबई – एकीकडे दैनंदिन वस्तूंच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना भाजीपाला स्वस्त होत आहे. टोमॅटो आणि कांद्याचे दर कमालीचे घसरले आहेत. घाऊक बाजारात किलोभर टोमॅटो अवघ्या ८ ते १० रुपयांत मिळत असल्याने किरकोळ बाजारात याची विक्री २० रुपये प्रति किलो होत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावरील ताण कमी झाला आहे.

गेल्या महिन्यात टोमॅटोच्या दराने पन्नाशी ओलाडंली होती. तसंच, इतर भाज्यांच्याही दरांत वाढ झाली होती. मात्र, हिवाळा सुरू होताच भाज्यांचे दर कमी झाले आहेत. तर, टोमॅटो आणि कांदाही स्वस्त झाला आहे. आवक वाढल्याने दरात घट झाल्याचं सांगण्यात येतंय.

घाऊक बाजारात टोमॅटोच्या ४० ते ४५ गाड्यांच आवक सध्या होत आहे. ही आवक मुंबई आणि उपनगरांतील टोमॅटोची मागणई पूर्ण करण्यासाठई पुरेशी आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर नियंत्रणआत आहेत.

टोमॅटो येतो कुठून?

मुंबईसह इतर भागात सातारा, पुणे, नाशिकमधून टोमॅटो येतो.

काही वेळा बेंगळुरू येथूनही टोमॅटोची आवक येते.

दर कमी का?

आवक वाढल्याने किंमती कमी झाल्या.

हवा तसा उठाव होत नसल्याने किमतीत घसरण

शेतकऱ्यांचं दिवाळं

एकीकडे ग्राहकांनी दिलासा व्यक्त केला असला तरीही शेतकऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. घाऊक बाजारात टोमॅटो अवघ्या १० रुपये प्रति किलोने विकले जात असल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघत नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं आहे.

First Published on: November 29, 2022 8:37 AM
Exit mobile version