खासगी, कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीत मिळणार बेस्ट बस पास

खासगी, कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीत मिळणार बेस्ट बस पास

बेस्ट उपक्रमाने, मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट कार्ड व मोबाईल अॅपद्वारे मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध केली आहे. आता खासगी व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही सवलतीच्या दरात बस पास उपलब्ध केला आहे. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांचा घर ते शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांपर्यंतचा प्रवास आता गारेगार व आनंददायी होणार आहे.

बेस्ट उपक्रम गेल्या काही वर्षांपासून कोटवधी रुपयांनी तोट्यात सुरू आहे. मात्र बेस्ट परिवहन विभागाकडून बस प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी डिजिटल सेवा, विविध नावीन्यपूर्ण सुविधा बहाल केल्या जात आहेत. दिव्यांग व्यक्तींनाही बेस्टकडून विशेष सुविधा देण्यात येते. आता उन्हाळ्याची सुट्टी संपली असून शाळा सुरू झाल्या आहेत. बेस्ट उपक्रम पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड व मोबाईल अॅपद्वारे मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध केली जात आहे. आता खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात बस पास उपलब्ध केला आहे. यासंदर्भतील माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बेस्ट प्रशासनाने, महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट कार्ड व मोबाईल अॅपद्वारे मोफत प्रवासाची सुविधा बेस्ट उपक्रमाने उपलब्ध करुन दिली आहे. परंतु खाजगी शाळांच्या विद्यार्थ्यासाठी अशा प्रकारची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार खाजगी शाळांमधील आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता इयत्ता ५ वी पर्यंत २०० रुपये, इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंत २५० रुपये आणि इयत्ता ११ वी १२ वी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता ३५० रुपये इतक्या सवलतीच्या दरामध्ये नवीन बसपास योजनेअंतर्गत (वातानुकूलित / विना वातानुकूलित) सुविधा बेस्ट उपक्रमाद्वारे देण्यात येत आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी ऑन लाईन म्हणजेच अॅपद्वारे तसेच ऑफलाईन देखील अर्ज करु शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बेस्टच्या बस आगारात येण्याची गरज भासणार नाही. या योजनेची संपूर्ण माहिती बेस्ट उपक्रमाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे. तरी सवलतीच्या बसपास योजनेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात आले आहे.


हेही वाचा : दोन वर्षांपासून सैन्य भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरूणाची आत्महत्या


 

First Published on: June 16, 2022 7:27 PM
Exit mobile version