पोलादपूर बस दुर्घटना; ३२ जणांचा मृत्यू तर एक जण बचावला

पोलादपूर बस दुर्घटना; ३२ जणांचा मृत्यू तर एक जण बचावला

33 Headed for a picnic died as Bus Fell 300-Feet in deep valley

रायगडच्या पोलादपूर घाटामध्ये खासगी बस दरीमध्ये कोसळल्याची घटना घडली आहे. महाबळेश्वर- पोलादपूर घाटामध्ये ८०० फूट खोल दरीमध्ये ही बस कोसळली. या बसमधून ३४ जण प्रवास करत होते. त्यामधील ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण सुदैवाने बचावला आहे. आतापर्यंत १२ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या बसमधून कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी प्रवास करत होते. हे सर्व जण महाबळेश्वरला पिकनिकसाठी जात होते. दरम्यान पोलीस यंत्रणा, एनडीआरएफ टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्स टीमकडून बचावकार्य सुरु आहे.

पिकनिकचा आनंद काही क्षणात ओसरला

महाबळेश्वर -पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटामध्ये ही घटना घडली आहे. १० वाजता बस अचानक दरीमध्ये कोसळली. सलग दोन दिवस सुट्टी असल्याने कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी पिकनिकसाठी महाबळेश्वरला निघाले होते. आज सकाळी पिकनिकला जाण्याआधी या सर्वांनी एक फोटो काढला होता. मात्र महाबळेश्वरला पोहचण्याआधीच त्यांच्या बसला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ३२ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण बचावले आहे. त्यामधील एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला पोलादपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामध्ये बसचा चुराडा झाला आहे. दरम्यान पोलादपूर घाटातील वाहतूक थांबवण्यात आली आहे. ही घटना कळताच रत्नागिरीमध्ये शोकाकुल वातावरण आहे. सध्या दापोली बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे.

अपघातात बचावलेले प्रकाश सावंत

काळ आला होता पण वेळ नाही 

दरम्यान या अपघातामध्ये ३४ पैकी ३२ जणांचा मृत्यू झाला. तर प्रकाश सावंत- देसाई हे सुदैवाने वाचले. तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर सध्या पोलादपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघाता दरम्यान प्रकाश यांनी बसच्या बाहेर उडी मारल्याने ते बचावले. दरीतूनवरती आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात ट्विट करुन दु:ख व्यक्त केले

याचे मृतदेह बाहेर काढण्यात यश 

या बस अपघातामध्ये हेमंत सुर्वे, पंकज कदम, राजेश बंडबे, सुनील कदम, किशोर चौगले, सुयश बाळ, सचिन झगडे, संदीप सुर्वे, एस .आर .शिंदे, श्रीकांत तांबे, राजेश सावंत, संदीप झगडे या कर्मचाऱ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये काही प्राध्यापक, लिपिक, सहाय्यक प्राध्यापक यांचा समावेश आहे.

First Published on: July 28, 2018 1:11 PM
Exit mobile version