बचतगटांची उत्पादने आता ‘अॅमेझॉन’वर

बचतगटांची उत्पादने आता ‘अॅमेझॉन’वर

ठाकरे सरकारला ओबीसीची बाजू मांडायचीच नव्हती - पंकजा मुंडे

राज्यातील महिला बचतगटांमार्फत उत्पादीत होणारी विविध उत्पादने आता अॅमेझॉनवर मिळणार विकली जाणार आहेत. बचतगटांमार्फत उत्पादीत झालेल्या दागिने, तूप, वेफर्स, कोसा सिल्क, तोरण, मसाले, चटण्या आदी विविध प्रकारच्या सुमारे १५० उत्पादनांचे आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते अॅमेझॉन सहेली संकेतस्थळावर लॉचींग करण्यात आले. ई-कॉमर्सच्या माध्यमातून राज्यातील महिला बचतगटांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने अॅमेझॉन आणि महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये (माविम) झालेली आजची भागीदारी फार महत्वपूर्ण ठरेल, असे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

पंकजा मुंडे यांनी पहिली खरेदी केली

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी पंकजा मुंडे यांनी बचतगटाद्वारे उत्पादीत झालेल्या पहिल्या वस्तुची थेट अॅमेझॉन सहेलीच्या संकेतस्थळावर जाऊन खरेदी केली. टस्सर सिल्कचा स्टोल (दुपट्टा) खरेदी करुन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या या ऑनलाईन चळवळीचा त्यांनी शुभारंभ केला. माविमच्या अक्ष्यक्षा ज्योती ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, अॅमेझॉनचे मार्केटींग हेड सतिश उपाध्याय यावेळी उपस्थित होते.

बचगटांना जागतिक बाजारपेठ लाभणार

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत आज शक्ती या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एमकेसीएल, बुक माय बाई डॉट कॉम, उर्वी अॅग्रोटेक यांच्याबरोबरही विविध सामंजस्य करार करण्यात आले. पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, महिला जोपर्यंत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत त्यांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होऊ शकणार नाही. त्यामुळेच राज्य शासनाने माविम आणि उमेद अभियानाच्या माध्यमातून बचतगटांच्या चळवळीला गती दिली आहे. अॅमेझॉनबरोबर भागीदारी करुन राज्यातील बचतगटांच्या उत्पादनांना आता जागतिक बाजारपेठ मिळेल. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकलेले आजचे हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

महिलांची १ लाख उत्पादने उपलब्ध

अॅमेझॉनचे मार्केटींग हेड सतिश उपाध्याय यावेळी म्हणाले की, अॅमेझॉनच्या सहेली साईटवर देशभरातील जवळपास १ लाख महिला उद्योजकांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. २०२० पर्यंत महिला उद्योजकांची ही संख्या १० लाखापर्यंत नेण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. आमचे उद्दीष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने माविमबरोबर आज झालेली भागीदारी अत्यंत महत्वपूर्ण ठरेल. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त बचतगटांची उत्पादने आम्ही अॅमेझॉन सहेलीवर लाँच करु, असे त्यांनी यावेळी सांगितले.

हे वाचा – गोरेगावच्या छोटा काश्मीरमधील तलावात एक जण बुडाला

माविमच्या अक्ष्यक्षा ज्योती ठाकरे म्हणाल्या की, महिला बचतगटांच्या ज्या महिला पुर्वी रस्त्यावर बसून किंवा प्रदर्शनात आपली उत्पादने विकत होत्या त्यांना आजच्या भागीदारीमुळे जागतिक बाजारपेठ घरबसल्या उपलब्ध होणार आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने अॅमेझॉनबरोबरची भागीदारी क्रांतिकारी ठरेल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी इस्त्राईलचे कौन्सिल जनरल याकोव्ह फिनकल्स्टेन, नाबार्डचे सरव्यवस्थापक यु. डी. शिरसाळकर, मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी निधी कामदार, प्रिया खान, माविमच्या सरव्यवस्थापक कुसुम बाळसराफ, महिला बालविकास विभागाच्या उपसचिव स्मिता निवतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

First Published on: October 25, 2018 10:25 PM
Exit mobile version