Omicron variant: राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, कल्याण-डोंबिवलीनंतर पुण्यामध्ये आढळला व्हेरियंटचा पहिला रूग्ण

Omicron variant: राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, कल्याण-डोंबिवलीनंतर पुण्यामध्ये आढळला व्हेरियंटचा पहिला रूग्ण

संपूर्ण जगभरात आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. भारतात ओमिक्रॉनचे तीन रूग्ण आढळल्यानंतर आता राज्यात सुद्धा ओमिक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केला आहे. कल्याण-डोबिंवलीमध्ये ओमिक्रॉनच्या पहिल्या रूग्णाची नोंद करण्यात आल्यानंतर आता पुण्यामध्ये सुद्धा व्हेरियंटचा पहिला रूग्ण आढळला आहे. हा रूग्ण झांबियातून पुण्यात परतला होता. या रूग्णाचं वय ६० आहे. या ६० वर्षीय व्यक्तीला डेल्टा सबलिनिएजची लागण झाली आहे. पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमिक्रॉन आढळलेला नाहीये. परंतु डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे.

एकीकडे डेल्टा व्हेरियंट तर दुसरीकडे ओमिक्रॉन हा एक व्हेरियंट आहे. कोरोना झाल्यानंतरही अजून चाचपणी केली जात आहे की त्या रूग्णामध्ये डेल्टा किंवा ओमिक्रॉनचा व्हेरियंट आढळला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली या परिसरात देखील ओमिक्रॉनचा एक रूग्ण आढळला आहे. डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेच्या केपटॉन हुन आलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णामध्ये ओमिक्रॉनचे व्हेरिएंट सापडले आहेत. यासंदर्भात केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली आहे. नॉन हाय रिस्कमधले नागरिक पॉझिटिव्ह आलेले आहेत. या रूग्णाच्या संपर्कात आलेले हायरिस्क लोरिस्क सर्व जणांची आम्ही कोरोना टेस्ट केली. यामध्ये विमानातील सहा प्रवाश्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. असे आयुक्तांनी सांगितले.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशातून आलेल्या ३ हजार ८३९ प्रवाश्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. देशांतून १७ हजारांच्या जवळपास आलेल्या प्रवाश्यांपैकी ३४४ प्रवाश्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर तपासणी केली असता १ डिसेंबरपासून आतापर्यंत ८ प्रवासी कोविड बाधित आढळले आहेत. तसेच त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.


हेही वाचा: कुष्ठरोग पीडित दिव्यांगांना दरमहा २५०० रुपये आर्थिक साहाय्य


 

First Published on: December 4, 2021 9:31 PM
Exit mobile version