पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात मोफा प्रकरणात 2016 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून ते जामीनासाठी प्रयत्न करत होते. अखेर पुणे न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

डीएसके कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंतीने फ्लॅट खरेदीदारकांकडून आगाऊ रक्कम घेतली होती, मात्र खरेदीदारकाला फ्लॅटचा ताबा दिला गेला नव्हता. या प्रकरणी कुलकर्णींना 2019 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याआधी 2018 पासून ते न्यायालयीन कोठडीत होते. तेव्हापासून ते तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. परंतु आता पुणे न्यायालयाचे न्यायाधीश एस.के. डुगावकर यांनी त्यांचा जामीन अखेर मंजुर केला आहे.

डीएसके यांच्या विरोधात 450 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. डीएसके आणि त्यांच्या पत्नी प्लॅट खरेदीदारांकडून आगाऊ रक्कम घेतली मात्र त्यांना प्लॅटचा ताबा न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात मोफा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला, यानंतर 5 मार्च 2019 रोजी डीएसके कुलकर्णींसह त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली, 17 फेब्रुवारी 2018 पासून ते तुरुंगात आहेत.

मात्र या गुन्हातून कुलकर्णी दाम्पत्याला जामीन मिळावा यासाठी डीएसके यांचे वकील आशुतोष श्रीवास्तव आणि अॅड. रितेश येवलेकर यांनी अर्ज केला होता. दरम्यान मुख्य गुन्ह्यातून जामीन मिळावा यासाठी देखील डीएसके यांनी अर्ज केला होता, हा अर्ज सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर आता 26 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.


सुरक्षा दलांनी राष्ट्रपतींच्या सचिवालयातून आंदोलकांना हुसकावलं, ५० जण जखमी; ९ जणांना अटक


First Published on: July 22, 2022 11:35 AM
Exit mobile version