आयुक्तांच्या चारचाकीला ट्रिपलसीटचा दंड

आयुक्तांच्या चारचाकीला ट्रिपलसीटचा दंड

आयुक्तांच्या चारचाकी गाडीला ट्रिपलसीटचा दंड

‘पुणे तिथं काय उणे’ या म्हणीचा प्रत्येय पिंपरी-चिंचवड पाहायला मिळाला आहे. शहरात वाहतूक पोलिसांच अत्यंत शिस्तबद्ध काम सुरू आहे. मात्र त्यांनी अक्षम्य चूक केली असून चक्क चारचाकी गाडीला ट्रिपलसीटची पावती फाडली आहे. हा सर्व प्रकार निगडी मधील सूरज स्वीट येथे घडला आहे. विशेषबाब म्हणजे ही चारचाकी दुसऱ्या तिसऱ्याची नसून चक्क पिंपरी-चिंचवड महानगर पालिका आयुक्तांची असल्याचे समोर आले आहे. आयुक्तांच्याच चारचाकीला ट्रिपलसीटचा दंड आकारण्यात आल्यामुळे हा विषय चर्चेचा ठरत आहे.

वाहतूक पोलिसांचा अजब कारभार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या एम. एच-१४ सी.एल १५९९ चारचाकी गाडीला वाहतूक पोलिसांनी ट्रिपलसीटची पावती फाडण्यात आली आहे. यासाठी त्यांना २०० रुपये दंड देखील आकारण्यात आला आहे. परंतु चारचाकी गाडीला ट्रिपल सीट दंड कसा? हा प्रश्न सर्वांना पडला. ही एक अक्षम्य चूक असून वाहतूक पोलिसांनी ती मान्य केली आहे. महानगर पालिका आयुक्त यांच्या गाडीचा नंबर एम.एच-१४ सी.एल १५९९ हा असून सेम नंबर एका दुचाकीचा आहे. यातील सिरीयल क्रमांक म्हणजे सी.एल ऐवजी डी.एल हे नजरचुकीने वाहतूक पोलिसाने केले होते. त्यामुळेच आयुक्त यांच्या गाडीला पावती फाडली गेली. त्यामुळे हा सर्व प्रकार नजर चुकीने झाल्याचे सांगण्यात येत आहे.

‘MH-14 DL-1599 च्या जागी सिरीयल मध्ये DL ऐवजी CL झाल्याने आयुक्तांच्या चारचाकी गाडीला दंड आकारण्यात आला हे सर्व नजर चुकीने झालं आहे.ते आम्ही दुरुस्त करू’  – रवींद्र निंबाळकर, वाहतूक पोलीस निरीक्षक निगडी

First Published on: January 15, 2019 1:52 PM
Exit mobile version