Pune Corona Update: पुण्यातील होम आयसोलेशनचे प्रमाण झाले कमी – राजेश टोपे

Pune Corona Update: पुण्यातील होम आयसोलेशनचे प्रमाण झाले कमी – राजेश टोपे

Pune Corona Update: पुण्यातील होम आयसोलेशनचे प्रमाण झाले कमी - राजेश टोपे

पुण्यात आज कोरोनाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिला. पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. येथील कोरोनाची परिस्थिती समाधनकारक असून होम आयसोलेश कमी झाले आहे. त्यामुळे पुण्यातील संस्थात्मक विलगीकरण वाढवण्यावर भर दिला आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

पुणे टेस्टिंगमध्ये नंबर वन 

पुढे टोपे म्हणाले की, ‘महाराष्ट्रात ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग वैज्ञानिक पद्धतीने केले पाहिजे, असे सगळ्या जिल्हाधिकारी, आयुक्त आणि आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सुचित करण्यात आले आहे. जे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग केलं जात, ते रेशोमध्ये झालंच पाहिजे. हाय रिस्क आणि लो रिस्कमध्ये टेस्टिंग झाली पाहिजे. टेस्टिंगची संख्या अजिबात कमी होता कामा नये. पुणे टेस्टिंगमध्ये नंबर वनमध्ये आहे, तशीच टेस्टिंग पुण्यात राहायला पाहिजे.’

‘पुण्यात ८० टक्के होम आयसोलेशन केसेस होत्या. पण मागे आम्ही निर्णय घेतल्यामुळे होम आयसोलेशनच्या केसेस ५६ टक्क्यांपर्यंत आल्या आहेत. त्यामुळे आता आम्ही टार्गेट दिलं आहे की, त्याची संख्या कमी होऊन त्या २५ ते ३० टक्के झाली पाहिजे. म्हणजे होम आयसोलेशन कमी झाले पाहिजे आणि संस्थात्मक विलगीकरण जास्त झाले पाहिजे. तसेच कोविड केअर सेंटरमध्ये अधिक रुग्ण भरती झाले पाहिजे. ग्रामीण भागात खासकरून हे झाली पाहिजे,’ अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

‘ग्रामीण भागासाठी जो तालुका आरोग्य अधिकारी असतो किंवा त्याच्या अंतर्गत काम करणारा कम्युनिटी आरोग्य अधिकारी असतो, त्याने कुठल्याही परिस्थितीत त्याच्या अखात्यारीत असलेल्या चार गावांमध्ये लक्ष्य दिले पाहिजे. उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेचा वापर केला पाहिजे आणि रुग्णाला ग्रामीण भागातून घेऊन तालुक्याच्या कोविड केअर सेंटरमध्ये आणले पाहिजे. ज्या ठिकाणी तालुक्यातील कोविड केअर सेंटर भरली असतील, तर त्या ठिकाण्यातील मोठ्या गावांमध्ये कोविड केअर सेंटर उभारले पाहिजे. त्या ठिकाणी सगळी व्यवस्था केली पाहिजे. यामुळे दोन गोष्टी साध्य होतील, रुग्णांचे आरोग्य धोक्यात जाणार नाही. कारण त्याला एका सिस्टममध्ये उपचार दिले जातील. दरम्यान होम आयसोलेशन नको, कुठल्याही परिस्थितीत संस्थात्मक विलगीकरण करण्याची आग्रही भूमिका सर्व लोकप्रतिनिधींनी घेतली. तशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत,’ असे राजेश टोपे यांनी सांगितले.


हेही वाचा – Maharashtra Lockdown 2021: राज्यातील लॉकडाऊन १५ दिवस वाढवला; १ जूनला नियमावली जाहीर होणार – राजेश टोपे


 

First Published on: May 28, 2021 6:10 PM
Exit mobile version