पुणेकरांची चिंता कायम, एका रात्रीत २५२ कोरोना रूग्णांची वाढ!

पुणेकरांची चिंता कायम, एका रात्रीत २५२ कोरोना रूग्णांची वाढ!

प्रातिनिधिक छायाचित्र

पुण्याच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यात काल एका रात्रीत २५२ कोरोना रूग्ण आढळले आहेत. एका रात्रीत कोरोना रूग्णांची झालेली वाढ चिंताजनक आहे. कोरोना रूग्णांची पुण्यात झपाट्याने वाढ होत आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४० हजार ८७वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ हजार ९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत २५ हजार ४५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

तर काल (सोमवारी) पुण्यात ६ हजार ४९७ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली १९३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यात देखील चिंताजनक परिस्थिती असून पुण्यात कोरोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला असून आज दिवसभरात सर्वाधिक कोरोनाचे ८३२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये सध्या २७ हजार ३४० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर १ हजार १७ रुग्णांवर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. तर ४८६ क्रिटिकल रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. त्यात १७४ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर कोरोनाचा संसर्ग झालेले ६१४ रुग्ण पुर्णपणे बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्जही देण्यात आला आहे.


हे ही वाचा – देशात कोरोनाचा कहर; बाधित रुग्णसंख्येने ओलांडला ९ लाखांचा टप्पा!


First Published on: July 14, 2020 10:51 AM
Exit mobile version