Pune corona: गेल्या २४ तासात १,२११ नवे पॉझिटिव्ह रुग्ण; ३५ जणांचा मृत्यू

Pune corona: गेल्या २४ तासात १,२११ नवे पॉझिटिव्ह रुग्ण; ३५ जणांचा मृत्यू

समोर आलेल्या आकडेवारीवरून कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईसह पुण्यात वाढत असल्याचे दिसत आहे. आज राज्यात १३ हजाराहून अधिक कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, पुणे शहरात गेल्या २४ तासात कोरोनामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला आहे तर पुण्याबाहेरील १२ जणांचा पुणे शहरात मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात कोरोनाचे १२११ नवे पॉझिटिव्ह रूग्ण शहरात आढळून आले आहेत तर दिवसभरात १०८९ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.त्यामुळे आता पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल १ हजार ८४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनावर उपचार घेणार्‍या १०८९ रुग्णांची तब्येत बरी असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ६० हजार ९६३ रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील उपचार घेत असलेल्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता १४ हजार ५५६ इतकी झाली आहे. तर ८१५ इतके कोरोनाचे गंभीर रुग्ण आहेत तर ४८३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आज ६६९० कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून पुणे शहरात आतापर्यंत एकूण ३ लाख ७७ हजार ०८१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांचा आकडो ७७३६८ वर पोहचला आहे. दरम्यान, सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल ६०९६३ रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ८६५ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून ४१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने शहरातील आणि ग्रामीण भागातील रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १४१ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण बाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ७१६ वर पोहचली असून पैकी, २५ हजार ३९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेले सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार १३७ आहे. अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.


Corona Update: राज्यात आज १३,१६५ नवे रूग्ण; ३४६ जणांचा मृत्यू
First Published on: August 19, 2020 9:43 PM
Exit mobile version