पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई; 12 लाखांचे ड्रग्ज साठा जप्त

पुण्यात दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई; 12 लाखांचे ड्रग्ज साठा जप्त

पुण्यात ड्रग्ज प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आलेल्या मुंबईतील एकाला राज्य दशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून 11 लाख 80 हजार रुपयांचे 118 ग्रॅम एम डी (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले आहे. महंमद फारूख उमर टाक असे या आरोपीचे नाव असून तो अंधेरी पश्चिम येथील म्हाडा कॉलनी येथे राहत होता.

दहशतवाद विरोधी पथकाच्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्का चौक रस्त्यावर ड्रग्ज घेऊन एक जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचून महंमद टाक या आरोपीला अटक केली, त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 11 लाख 80 हजार रुपयांचे 118 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ जप्त केला आहे. याशिवाय त्याकडून मोबाईल, डिजिटल वजन काटा, 2 हजार 590 रुपयांची रोकड, आधारकार्ड, डेबिट कार्ड हा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार अशोक पेरणेकर यांनी दहशतवाद विरोधी पथकाच्या मुंबई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाचा पुढील अधिक तपास विश्वास भास्कर करीत आहेत.


छत्तीसगड- महाराष्ट्र बॉर्डरवर नक्षलवाद्यांशी चकमक; गोळीबारात एक जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरु


First Published on: May 3, 2022 12:57 PM
Exit mobile version