Pune Crime : 300 कोटींच्या बिटकॉईनच्या लालसेपोटी पोलीस कर्मचाऱ्यानेच केले व्यापाऱ्याचे अपहरण ; 8 जणांना अटक

Pune Crime : 300 कोटींच्या बिटकॉईनच्या लालसेपोटी पोलीस कर्मचाऱ्यानेच केले व्यापाऱ्याचे अपहरण ; 8 जणांना अटक

Pune Crime : 300 कोटींच्या बिटकॉईनच्या लालसेपोटी पोलीस कर्मचाऱ्यानेच केले व्यापाऱ्याचे अपहरण ; 8 जणांना अटक

हल्ली क्रिप्टोकरन्सीला मोठ्या प्रमाणात मागणी असून, यासाठी लोकांचे अपहरण होण्याच्या घटना समोर येत आहेत. पुण्यालगतच्या पिंपरी चिंचवडमध्ये एका व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्यासह ८ जणांना अटक करण्यात आली आहे. शेकडो कोटींची क्रिप्टोकरन्सी बाळगणाऱ्या एका व्यापाऱ्याचं अपहरण करुन त्यांच्याकडून खंडणी उकळल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. या सर्व प्रकारामुळे पिंपरी चिंचवड पोलीस दलाची मान शर्मेने झुकली असलयाचे चित्र पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणातील मुख्य सूत्रधार हवालदार दिलीप तुकाराम खंदारे असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.

काय आहे नेमका प्रकरण ?

पोलीस कर्मचारी दिलीप खंदारेने शेकडो कोटींची क्रिप्टोकरन्सी बाळगणाऱ्या विनय सुंदरराव नाईक याचे अपहरण करण्याचा कट रचला. या खंडणी उकळण्याच्या प्रकरणामध्ये खंदारे याने त्याचा मित्र प्रदीप काटे यांच्यासह या प्लॅनचे नियोजन आखले. दिलीप खंदारे हा पूर्वी पुणे सायबर पोलीस शाखेत कार्यरत होता. पुण्यात कार्यरत असताना त्याने मोबाईल फॉरेन्सिक, ऑफीस ऑटोमेशन, सायबर गुन्हे प्रणाली,अॅडव्हान्स सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन टेक्नॉलॉजी यांसारखे अनेक कोर्स केले होते. त्यामुळे पोलीस कर्मचारी खंदारे तंत्रज्ञानात निष्णात आहेत. काही दिवसानंतर खंदारेची बदली होऊन तो पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत झाला. कोर्सच्या दरम्यान त्यांना विनय सुंदरराव नाईक यांच्याकडे 300 कोटी रुपयांची क्रिप्टोकरन्सी असल्याचे माहित झाले होते.

विनय नाईक याला अलिबाग येथे डांबून ठेवलं…

त्यानंतर आठ मित्रांसह अपहरणाचा कट खंदारे यांनी रचला. नाईक यांना अपहरणकर्त्यांनी पुण्यातील एका हॉटेलमधून नाईक यांना उचलले होते. त्याच्या मित्राने अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यांचा शोध घेण्यासाठी वाकड पोलीस ठाण्याचे पथक तैनात करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी विनय नाईक याला अलिबाग येथे डांबून ठेवलं आहे. पोलीस शोध घेत असल्याचे अपहरणकर्त्यांना समजताच विनय नाईकला वाकड परिसरात सोडून दिलेकाही दिवसांनी विनय नाईक त्यांच्या घरी आला आणि 8 आरोपींनाही अटक करण्यात आली.

‘या’ आठ आरोपींना केले अटक

बुधवारी पुणे पोलीस परिमंडळ-2 चे उपायुक्त (डीसीपी) आनंद भोईटे यांनी सांगितले की, सुनील राम शिंदे, वसंत श्याम चव्हाण, फ्रान्सिस टिमोटी डिसोझा, मयूर महेंद्र शिर्के, प्रदीप काशिनाथ काटे, संजय उर्फ ​​निक्की राजेश यांच्यासह पोलीस हवालदार तुकाराम खंदारे. याप्रकरणी बन्सल आणि शिरीष चंद्रकांत खोत यांना अटक करण्यात आली आहे.आरोपी पोलीस कर्मचारी खंदारेच कृत्य निंदनीय असल्याने चुकीला माफी नाही, या न्यायाने खंदारे विरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.


हे ही वाचा – भ्रष्टाचार प्रकरणी परमबीर सिंह यांची एसीबीकडून चौकशी, अनुप डांगेंनी केला होता आरोप


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

First Published on: February 2, 2022 11:44 AM
Exit mobile version