पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम रजिस्ट्रेशन पुणे जिल्हा अव्वल स्थानी

पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम रजिस्ट्रेशन पुणे जिल्हा अव्वल स्थानी

चौदाव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीसाठी केंद्र सरकारने विकसित केलेल्या पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम प्रणालीवर रजिस्ट्रेशन करण्यामध्ये पुणे जिल्हा अव्वल स्थानी आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.

केंद्र शासन पुरस्कृत 14 वा वित्त आयोगाचा निधी प्रदान करण्यासाठी पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली विकसित होण्याअगोदर चौदाव्या वित्त आयोगाचा निधी केंद्र स्तरावरून राज्य स्तरावर जिल्हा परिषद व नंतर जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत स्तरावर वितरीत केला जात असतो. मात्र आता हा निधी पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम या प्रणालीद्वारे थेट ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात येणार आहे. या प्रणालीवर ग्रामपंचायतीस प्राप्त झालेला निधी व खर्च यासंदर्भातील सविस्तर माहिती पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे पुरवठादार आणि ठेकेदार यांची देयके ही चेक आणि डीएससीच्या माध्यमातून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रणालीमध्ये आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याने सर्व ग्रामपंचायतीचे रजिस्ट्रेशन पूर्ण करून राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. दरम्यान, या कामगिरीबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुख सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी ग्रामसेवक व केंद्रचालक यांचे अभिनंदन केले आहे.

First Published on: September 6, 2018 12:41 AM
Exit mobile version