आईसाठी मदत करा म्हणत चार महिला आमदारांची ऑनलाइन फसवणूक

आईसाठी मदत करा म्हणत चार महिला आमदारांची ऑनलाइन फसवणूक

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतेय. अशा घटनाच्या महिला आमदाराही बळी ठरल्याची घटना समोर आली आहे. राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक करत त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पुण्यातील बिबडेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून ही फसवणूक झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे अशी फसवणूक झालेल्या राज्यातील चार महिला आमदारांची नाव आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आमदार माधुरी मिसाळ यांच्या मोबाईलवर एका मुकेश राठोड नामक व्यक्तीने फोन केला, यावेळी त्याने आपली आई बाणेर येथील रुग्णालयात दाखल असून तिला उपचारांसाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. यानंतर आरोपीने एक गुगल पेचा नंबर देत त्यावर ३ हजार ४०० रुपये पाठविण्याची विनंती केली,  त्यानुसार मिसाळ यांनी पैसे पाठविले. याचप्रमाणे आरोपीने आमदार माधुरी मिसाळ यांच्या सहकारी आमदार मेघना बोर्डिकर साकोरे, आमदार देवयानी फरांदे आणि आमदार श्वेता महाले आर्थिक फसवणूक केली. महिला आमदारांनी  मदत म्हणून संबंधित व्यक्तीला ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले होते, मात्र हा बनावट कॉल असल्याचे समोर आल्यानंतर आमदारांनी तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी पूजा मिसाळ यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याप्रकरणातील तपासादरम्यान आरोपींनी 4 महिला आमदारांशी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पुढील तपासासाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे तपास करीत आहेत.  मुकेश राठोड असे या आरोपीचे नाव असून त्याची चौकशी सुरु आहे. आरोपीने ण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडून google पे च्या माध्यमातून 4300 रुपये उकळले होते. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


नुपूर शर्मा प्रकरणाचे बिहारमध्ये पडसाद; तरुणाला चाकूने भोकसले

First Published on: July 19, 2022 11:10 AM
Exit mobile version