नुपूर शर्मा प्रकरणाचे बिहारमध्ये पडसाद; तरुणाला चाकूने भोकसले

सीतामढीच्या घटनेचा एक कथित व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये युवकाला पळवत त्याच्यावर सहा वेळा चाकूने वार करण्यात आले आहेत

udaipur like case after watching nupur sharma video in sitamarhi young man stabbed read whole matter

नुपूर शर्मांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्त्याला समर्थन दिल्याने देशात हिंसक घटना घडत आहेत. राजस्थानच्या उदयपूर आणि महाराष्ट्रातील अमरावतीनंतर आता बिहारच्या सीतामढीमध्येही हिंसाचाराची घटना घडली आहे. नुपूर शर्मांचा वादग्रस्त व्हिडीओ पाहिल्यानंतर एका तरुणाला चाकूने भोकसले आहे. मात्र पोलिसांकडून हे नुपूर शर्मांच्या संबंधित प्रकरण असल्याचा इन्कार केला आहे.

सीतामढीच्या नानपूरमध्ये अंकित झा (23) नामक तरुणावर हा हल्ला करण्यात आला आहे. यात तो गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना 15 जुलै रोजी घडल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. मुख्य आरोपी अद्याप कोठडीबाहेर आहे. यामध्ये नानपूर गावातील गौरा उर्फ मोहम्मद निहाल आणि मोहम्मद बिलाल यांचा समावेश आहे.

हेही वाचा – अटकपूर्व जामिनासाठी नुपूर शर्मा सर्वोच्च न्यायालयात

सीतामढीच्या घटनेचा एक कथित व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये युवकाला पळवत त्याच्यावर सहा वेळा चाकूने वार करण्यात आले आहेत. यात तरुण रक्ताने माखलेल्या अवस्थेत दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हा तरुण एका पान दुकानात उभा राहत नुपूर शर्मांचा व्हिडिओ पाहत होता. त्यानंतर यावेळी तिथे सिगारेट ओढत असलेल्या एका तरुणाशी वाद झाला. त्यानंतर सिगारेट ओढणारा तरुण त्याच्या साथीदारांसह तिथे आला आणि त्याने अंकितवर हल्ला केला. लोकांच्या गर्दीने भरलेल्या बाजारात अंकितला पळत त्यावर सहा वेळा वार करण्यात आले. यानंतर अंकितला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

हेही वाचा –  नुपूर शर्मा प्रकरण : लोकांना धमकावणाऱ्या चौघांना अमरावतीत अटक

तक्रारीतून नुपूरचे नाव वगळले, नातेवाईकांचा आरोप

अंकित झा याच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत एफआयआर नोंदवण्याच्या पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कुटुंबीयांचा आरोप आहे की, पहिल्या तक्रारीत पोलिसांनी हल्ल्याबाबत नुपूर शर्मा प्रकरणाचा उल्लेख केला होता, पण नंतर पोलिसांनी ते बदलण्यास सांगितले. दुसऱ्या तक्रारीवरून नुपूर शर्माचे नाव हटवल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला. नुपूर शर्माचा व्हिडिओ पाहून इतर धर्माच्या तरुणांनी त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप अंकितच्या कुटुंबीयांनी केला आहे.

दुसरीकडे नानपूर पोलिस स्टेशनचे एचएचओ विजय कुमार राम म्हणतात की, या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नानपूर गावातील रहिवासी असलेल्या अंकित झा याच्या वडील मनोज झा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने आरोपींची नावे सांगितली असून, त्यांचा शोध सुरू आहे.


हेही वाचा – पंतप्रधानांबद्दल अपशब्द म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे, अलाहाबाद हायकोर्टाने सुनावले