पुण्यातील पाषाण-सुस रोडवर भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

पुण्यातील पाषाण-सुस रोडवर भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही

सध्या दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. पुण्यात सुद्धा सातत्याने मागील काही दिवसांपासून वाहातून कोंडी वाढत आहे आणि त्यातच पावसाचेही प्रमाण वाढल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे. अशातच पुण्यात पाषाण – सुस परिसरात आज भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. यात पाच जण जखमी झाले आहेत

हे ही वाचा –  मंत्री महोदयांच्या उपचारांदरम्यान रुग्णालयात ‘बत्तीगुल’, केला ‘हा’ उपाय

पुण्यातील पाषाण – सुस रोडवर एका मागोमाग एक सात ते आठ गाड्यांची धडक लागल्याची घटना घडली आहे. घडलेल्या घटनेत या गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात शिवशाही बसचाही समावेश आहे. सोबतच चार चाकी गाड्यांचाही समावेश आहे.

हे ही वाचा –  भाजपने ती निवडणूक लढवू नये; राज ठाकरेंची उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्राद्वारे विनंती

First Published on: October 16, 2022 5:08 PM
Exit mobile version