घरमहाराष्ट्रमंत्री महोदयांच्या उपचारांदरम्यान रुग्णालयात 'बत्तीगुल', केला 'हा' उपाय

मंत्री महोदयांच्या उपचारांदरम्यान रुग्णालयात ‘बत्तीगुल’, केला ‘हा’ उपाय

Subscribe

मंत्री संदीपान भुमरे यांच्या दातावर शासकीय दंत महाविद्यालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांची एक टीम संदीपान भुमरे यांच्या दातांवर उपचार करण्यासाठी प्रयत्न करत होती.

सर्वसामान्यांच्या घराची अचानक लाईट जाणे हे काही नवीन नाही पण जर का हेच मंत्र्यांच्या बाबतीत घडलं तर मग त्याची चर्चा होते. आणि ते ही उपचार सुरु असताना घडलं तर… अशीच एक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.

दरम्यान, राज्याचे रोजगार योजना मंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे (sandipan bhumre) यांच्याबाबद असाच एक प्रकार घडला आहे. मंत्री संदीपान भुमरे यांच्या दातावर शासकीय दंत महाविद्यालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांची एक टीम संदीपान भुमरे यांच्या दातांवर उपचार करण्यासाठी प्रयत्न करत होती. उपचार सुरु असताना अचानक लाईट गेली. मग शेवटी मोबाईलच्या टॉर्चचा आधार घेत डॉक्टरांनी पुन्हा संदीपान भुमरे यांच्या दातांवर पुन्हा उपचार सुरु केले.

- Advertisement -

दरम्यान औरंगाबादच्या (aurangabad) शासकीय दंत रुग्णालयात जनरेटरही उपलब्ध नव्हता. त्यामुळे आयत्या वेळी लाईट गेल्यावर सर्वांचीच तारांबळ उडाली. एखाद्या रुग्णायालात अचानक लाईट गेल्यावर जनरेटरची सुविधा सुद्धा उपलब्ध नसणं या गोष्टीचा मंत्री महोदयांनी गांभीर्याने विचार करायला हवा. दम्यान सर्वसामान्यांना कायमवच अशा बात्तिंगुलला समोरं जावं करावा लागतं. या अवेळी जाणाऱ्या लाइटमुळे शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर संघर्ष करावा लागतो. दरम्यान हा लाईट जाण्याच्या प्रकाराची सर्वत्रच जोरदार चर्चा सुरु आहे.


हे ही वाचा –  सुप्रिया सुळेंनी केले भाजपचे ‘नामकरण’, म्हणाल्या…

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -