बाळासाहेब ठाकरे शरद पवारांवर टीका करायचे यातच गंमत आहे, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

बाळासाहेब ठाकरे शरद पवारांवर टीका करायचे यातच गंमत आहे, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर

पुणे – दसरा मेळाव्यावरून सध्या राज्यभरात वाद सुरू आहेत. शिवाजी पार्कवर नक्की कोण दसरा मेळावा घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. दरम्यान, दसरा मेळावा शिवसेनेचाच असा नारा शरद पवारांनीही दिला होता. यावरून शरद पवारांना जुने दाखल देत त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. या टीकेवर सुप्रिया सुळेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. “बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवरून शरद पवारांवर टीका करायचे यातच तर गंमत आहे. विरोधक हा दिलदार असायला हवा. नाहीतर राजकारण आणि समाजकारण करायला मज्जा कशी येणार?” असा प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – शिवतीर्थावरच शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, पालिका देणार परवानगी; किशोरी पेडणेकरांचा दावा

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की,”माय-बा जनतेला वाऱ्यावर सोडणं कितपत योग्य याचं आत्मचिंतन ओरबाडून आलेल्या खोके सरकारने करावं. महाविकास आघाडीसरकारमध्ये अजित पवार पालकमंत्री असताना पुण्यात दर आठवड्यात आढावा बैठक व्हायची. पण आता सत्ताधारी तसं काहीच करत नाहीत. त्यामुळे विकासकामं पेंडिंग राहत आहेत. २३ गावातील कचरा आणि पाणी समस्या अजूनही तशीच आहे. प्रशासक आणि शहराला पालकमंत्री नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. म्हणूनच खासदार या नात्याने पुणे मनपा आयुक्तांची भेट घेऊन या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला.”

First Published on: September 20, 2022 3:37 PM
Exit mobile version