घरमहाराष्ट्रशिवतीर्थावरच शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, पालिका देणार परवानगी; किशोरी पेडणेकरांचा दावा

शिवतीर्थावरच शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, पालिका देणार परवानगी; किशोरी पेडणेकरांचा दावा

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना म्हणवणारे झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायद्याला मानणारे असतील आणि आहेत असा दावा आहे. उद्धव ठाकरेंनी पहिलाच सांगितले की, दसरा मेळावा होणारचं आणि तो शिवाजी पार्कच्या शिवतीर्थांवरचं. महापालिकेच्या परवानगीवर कदाचित ते करत असतील. पण मला खात्री आहे शिवसेनेलाच परवानगी मिळेल. नाकारण्यासाठी कारणं द्यावं लागतील. पण कारणं देत कोंडी करत असतील तर महाराष्ट्राची जनता बघतेय. असा शब्दात शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणरा असल्याचे जाहीर केले आहे. किशोरी पेडणेकर यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी पेडणेकर म्हणाले की, अनेक तज्ज्ञांनी त्यावर मत दिले की, एक मैदान एक झेंडा, एक नेता, एक पक्ष हे समीकरण आहे, मात्र अनेक लोकं हे समीकरण बदलू इच्छित आहेत. कोंडी करत आहेत. प्रत्येकाला माहित आहे की, दसरा म्हटलं की शिवसेनेचा मेळावा. गेली 65 वर्षे शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. मधली एक दोन वर्षे कोरोनाची सोडली तर आणि त्या आधी भरपूर पाऊस पडल्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा रद्द झाला होता, त्या आधी कधीच दसरा मेळावा थांबला असं झालं नाही. अगदी 2012 ला स्वत; बाळासाहेब ठाकरे अस्वस्थ असताही सर्वांना टॉनिक देण्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर ते आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या मेळाव्याबाबत आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भूमिका मांडतील. असं किशोरी पेंडणेकर म्हणाल्या आहेत.


उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये भिंत कोसळल्याने 4 मजुरांचा मृत्यू, 12 जणांना वाचवण्यात यश


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -