तुमच्या काळात हिरवे झेंडे लागले, मशिद पाडली; चंद्रकांत पाटलांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

तुमच्या काळात हिरवे झेंडे लागले, मशिद पाडली; चंद्रकांत पाटलांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

chandrakant patil

पुणे – पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी भारताविरोधी घोषणाबाजी केल्याने अनेक विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी आदित्य ठाकरेंनीही शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली होती. यावरुन पुण्याचे नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

जनआक्रोश आंदोलनावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “पुण्यात हा गैरप्रकार घडला आहे. ज्यांनी कुणी या घोषणा दिल्या असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. पण नेमक्या याच सरकारच्या काळात कशा या घोषणा झाल्या? महाविकास आघाडीच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नव्हता.” यावरून चंद्रकांत पाटलांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

हेही वाचा – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर २७ सप्टेंबरला होणार सुनावणी, घटनापीठ काय निर्णय घेणार?

“तुमच्या अडीच वर्षांच्या काळात कसे हिरवे झेंडे लागले, त्रिपुरात मशीद पाडली अशी अफवा उठल्यानंतर मालेगाव-अमरावतीत ४०-५० हजारांचा मॉब रस्त्यावर आला. हे विसरलात काय आदित्यजी? सरकार गेल्यामुळे तुम्ही एवढे विमनस्क अवस्थेत आहात की तुम्हाला आठवतच नाही की तुमच्या काळात काय काय झालं”, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – मुकेश अंबानींनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, मध्यरात्रीच्या भेटीत काय ठरलं?

“आम्ही पुणे महापालिकेची निवडणूक सरकार नसतानाही जिंकणार होतो. आता तर सरकार आले आहे. मी पालकमंत्री झालो आहे. सरकार नव्हते त्यावेळी आम्हाला ८२ जागा मिळतील, असं सर्व्हेमध्ये सांगितलं गेलं. पण महापौर होण्यास ८५ जागा लागतात. मात्र आता सर्व अनुकूलता आली आहे. त्यामुळे आता आम्ही शंभरी क्रॉस करू”, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

First Published on: September 25, 2022 11:05 AM
Exit mobile version