सदानंदाचा यळकोट! चंपाषष्ठी निमित्त भाविकांचा जेजुरीच्या खंडोबा मंदिरात जल्लोष

सदानंदाचा यळकोट! चंपाषष्ठी निमित्त भाविकांचा जेजुरीच्या खंडोबा मंदिरात जल्लोष

यळकोट यळकोट जय मल्हार असे म्हणत अनेक भक्त जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी जातात. जेजुरीमधील खंडोबा देवस्थान म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. आज चंपाषष्ठी निमित्त सोन्याच्या जेजुरीत खंडोबा भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. खंडोबाच्या नावाचा जयघोष करत जेजुरीचा खंडोबा मंदिर परिसर दुमदुमून निघाला.

पुण्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आज चंपाषष्ठीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने अनेक धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.

चंपाषष्ठीच्या निमित्ताने जेजुरीच्या खंडोबा मंदिर परिसरात जल्लोष करत भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली.

आज पहाटे पासूनच जेजुरीच्या खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी निमित्त भाविकांनी देवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

आज सकाळी खंडोबाच्या उत्सव मूर्तींना अभिषेक घालून त्यांची यथासांग पुजा करण्यात आली. त्यांनतर खंडोबाच्या आवडीचा वांग्याची भाजी आणि भाकरी असा नैवेद्यसुद्धा दाखवीण्यात आला.

चंपाषष्ठी निमित्त सुरू असलेल्या सहा दिवसाच्या षडरात्र उत्सवाची सांगतासुद्धा आज होते.

चंपाषष्ठी निमित्त मोठ्या प्रमाणात खंडोबाचे भक्त जेजुरीत आले आहेत. बुधवारी सकाळी मार्गशीर्ष प्रतिपदेच्या महुर्तावर चंपाषष्ठी उत्सवास सुरुवात झाली आहे.

जेजुरीत खंडोबा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर फुलांची सुंदर आकर्षक सजावटसुद्धा करण्यात आली. खंडोबाच्या नावाचा जयघोष करत आणि भंडाऱ्याची उधळण झाल्याने मंदिर परिसरात मंगलमय वातावरण झाले.


हे ही वाचा – ओझर : बारागाड्या ओढण्यासाठी मैदान तयार; यंदा धुमधडाक्यात यात्रोत्सव

First Published on: November 29, 2022 5:10 PM
Exit mobile version