पुणे रेल्वे विभागाला दिवाळीत ‘लक्ष्मी’ झाली प्रसन्न; इतक्या कोटींचे उत्पन्न

पुणे रेल्वे विभागाला दिवाळीत ‘लक्ष्मी’ झाली प्रसन्न; इतक्या कोटींचे उत्पन्न

पुणे रेल्वे विभागाला दिवाळीत 61 कोटी 64 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे..

पुणे: मध्य रेल्वेच्या पुणे विभागाची यंदाची दिवाळी गोड झाली आहे. पुणे विभागाला करोडो रुपयांचा फायदा झाला आहे. पुणे रेल्वे विभागाला दिवाळीत 61 कोटी 64 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. (Pune Division of Central Railway has got an income of Rs 61 crore 64 lakh in Diwali 2023)

दिवसाला दीड लाख प्रवाशांनी केला प्रवास

रेल्वे प्रशासनाने दिनांक 1 ते 19 नोव्हेंबर दरम्यान 22 विशेष रेल्वे गाड्यांच्या 260 फेऱ्या केल्या. त्यामुळे दिवाळीच्या काळात रेल्वेला तिकीट विक्रीतून चांगलं उत्पन्न मिळालं आहे. पुणे रेल्वे विभागातून नोव्हेंबरच्या पहिल्या 19 दिवसांमध्ये 28.2 लाख प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास केला आहे. त्यामधून रेल्वेला 60 कोटी 69 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिवाळी होती. त्यावेळी महिनाभरात 41.56 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यामधून पुणे रेल्वे विभागाला 79 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं होते. यंदा दिवाळीच्या काळात दिवसाला साधारण दीड लाख प्रवाशांनी केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिवसाला 1 लाख 36 हजार प्रवासी प्रवास करत होते. यंदा 13 ते 14 हजार प्रवाशांची वाढ झाली आहे.

दिवाळीमध्ये रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांना गर्दी असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोईसाठी विशेष गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली आणि रेल्वेला उत्पन्नदेखील चांगले मिळाले आहे – डॉक्टर रामदास भिसे, वाणिज्य व्यवस्थापक व जनसंपर्क अधिकारी.

1 ते 19 नोव्हेबंर दरम्यान रेल्वेचे प्रवासी

28.2 लाख

1 ते 19 नोव्हेंबर दरम्यान रेल्वेचे उत्पन्न

60.69 कोटी

1 ते 19 नोव्हेंबर दरम्यान सोडलेल्या विशेष गाड्या

22

ऑक्टोबर 2022 मध्ये रेल्वेचे प्रवासी

41 लाख

ऑक्टोबर 2022 मध्ये रेल्वेचे उत्पन्न

79 कोटी

(हेही वाचा: ड्रग्ज माफिया ललित पाटीलला दाखल करून घेण्यास ससून रुग्णालयाचा नकार )

 

First Published on: November 23, 2023 10:37 AM
Exit mobile version