घरक्राइमड्रग्ज माफिया ललित पाटीलला दाखल करून घेण्यास ससून रुग्णालयाचा नकार

ड्रग्ज माफिया ललित पाटीलला दाखल करून घेण्यास ससून रुग्णालयाचा नकार

Subscribe

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला नऊ महिने ससून रुग्णालयात उपचार घेत होता. सध्या ललित पाटील हा पोलीस कोठडीत असून सध्या त्याला हर्नियाचा त्रास सुरू झाला आहे. यामुळे उपचारासाठी दाखल करण्यास ससून रुग्णालयाने नकार दिला आहे. पण ललित पाटीलला दररोज रुग्णालयात येऊन उपचार घेऊन परत पाठवण्यात येणार आहे. कारण ललित पाटील प्रकरणामुळे ससून रुग्णालयाची बदनामी झाली.

ललित पाटील ससून रुग्णालयातून ड्रग्ज तस्करी करत असल्याचा त्यांच्यावर आरोप केला आहे आणि ललित पाटीलला पळवून लावण्यात रुग्णालयाचा हात असल्याचेही अनेकांनी दावा केला आहे. पोलिसांनी ललित पाटीलला अटक केल्यानंतर त्यांनी सांगितले की, मी पळालो नाही तर पळवून लावले, या सर्व घटनाक्रमावरून ससून रुग्णालय हे वादाच्या भोवऱ्यात अडकले. या प्रकरणी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर आणि डॉ. देवकाते यांची उचलबांगडी देखील करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – मोठी बातमी: ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अखेर अटक

रुग्णालयाकडून दाखल करून घेण्यास नकार;पण…

ललित पाटील यांच्या पोलीस कोठडीत पुणे न्यायालयाने 24 नोव्हेंबरपर्यंत वाढवली. सध्या ललित पाटीलला हर्नियाचा त्रास सुरू झाला. यामुळे ललित पाटीलला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. पण दररोज रुग्णालयात उपचार घेऊन परत पाठवण्यात येईल. ड्रग्ज प्रकरणानंतर ललित पाटीलचा ससून रुग्णालयाने धसका घेतल्याचे दिसून आले.

- Advertisement -

हेही वाचा – Breaking : डॉ. संजीव ठाकूर यांची उचलबांगडी; ललित पाटील प्रकरण आलं अंगलट?

वार्ड नंबर 16 तील पोलिसांना देत होता पैसे

मी पळालो नाही तर मला पळवून लावले,एवढेच नाही तर मी सगळ्यांची नावे सांगणार, असे ललित पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर म्हटला होता. ललित पाटीलच्या वक्तव्याने राज्याचे वातावरण ढवळून निघाले होते. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कारागृहात होता. मात्र, तो उपचाराचे कारण देत ससून रुग्णालयातच होता. या दरम्यान तो हवे तसे कुठेही फिरत होता. ससून रुग्णालयातून हॉटेलमध्ये जात होता. त्यासाठी ललित पाटील महिन्याला 17 लाख रुपये देत होता. पोलीस तपासात ललित पाटील याने ही माहिती दिली. 16 नंबर वार्डात ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तो पैसे देत होता हेसुद्धा आता उघड झाले आहे, असे अनेक धक्कादायक खुलासे केले आहे.

हेही वाचा – ललित पाटील प्रकरणातील महिला आरोपी आहे मनोरुग्ण, वकिलांनी केली जामीनाची मागणी

ललित पाटीलला पोलिसांनी असे केले अटक

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला हा 2 ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पळून गेला. यानंतर तीन तासानंतर कंट्रोल रुमला ललित पाटील पळून गेल्याची माहिती मिळाली. ललित पाटीलचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दहा पथके नेमण्यात आली होती. ससून रुग्णालयातून फरार झालेला ललित पाटील हा चेन्नईत लपून बसला होता. अखेर मुंबई ललित पाटीलला पोलिसांनी 17 ऑक्टोबर रोजी पकडण्यात यश आले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -